IIT MUMBAI प्रथमच सर्वाधिक प्लेसमेंट; 25 विद्यार्थ्यांना कोटीचे...

IIT Mumbai
IIT MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : आयआयटी मुंबईच्या (IIT Mumbai) इतिहासात यंदा प्रथमच प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक 1481 नोकरीच्या ऑफर्स स्वीकारण्यात आल्या आहेत. प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात 25 विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष एक कोटीपेक्षा अधिक पॅकेज मिळाले आहे. रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेक्टरच्या सर्वसाधारण पॅकेजमध्ये वाढ झाली आहे, तर आयटी आणि सॉफ्टवेअर सेक्टरच्या सर्वसाधारण पॅकेजमध्ये घसरण झाली आहे. 1 ते 16 डिसेंबरदरम्यान आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटची फेज 1 ची सुरुवात झाली.

IIT Mumbai
'या' तंत्रज्ञानातून मुंबई महापालिका भर पावसातही बुजविणार खड्डे

एकूण 283 कंपन्यांमधील देण्यात आलेल्या 1648 पैकी 1481 नोकरीच्या ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत. यात 63 आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑफर्स आहेत. यंदा सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचे पॅकेज विद्यार्थ्याला मिळाले असून दुसऱ्या क्रमांकावर वार्षिक 1.31 कोटी पॅकेजची नोकरी विद्यार्थ्याने स्वीकारली आहे. मागील काही वर्षांच्या तुलना केली असता फायनान्स आणि रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट सेक्टरच्या ऍव्हरेज पॅकेजमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर आयटी ऍण्ड सॉफ्टवेअर सेक्टरच्या देण्यात आलेल्या ऍव्हरेज पॅकेज ऑफर्समध्ये काही प्रमाणात घट झाली आहे.

IIT Mumbai
'कॅग'ला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची नोटीस; कोविड काळातील खर्च...

यंदाच्या प्लेसमेंट फेज 1 मधील विविध पॅकेज अशी आहेत. इंजिनीअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी - ऍव्हरेज पॅकेज - वर्षाला -21.20 लाख, आयटी ऍण्ड सॉफ्टवेअर - ऍव्हरेज पॅकेज - वर्षाला 24.31 लाख, फायनान्स - ऍव्हरेज पॅकेज - वर्षाला 41.66 लाख, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट - ऍव्हरेज पॅकेज - वर्षाला 32.25 लाख, कन्सल्टिंग - ऍव्हरेज पॅकेज - वर्षाला 17.27 लाख अशा पॅकेजचा समावेश आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com