राज्यपाल कोश्यारी Action Mode मध्ये! सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार

राज्यपाल कोश्यारी Action Mode मध्ये! सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार
Published on

मुंबई (Mumbai) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये शासन आदेश काढण्याचा सपाटा सुरू आहे. या संदर्भात खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हस्तक्षेप करत २२, २३ आणि २४ जून या तीन दिवसांमध्ये किती शासन निर्णय काढण्यात आले आहेत. त्याची माहिती सादर करावी, अशा आशयाचे पत्र मुख्य सचिवांना पाठवले आहे.

राज्यपाल कोश्यारी Action Mode मध्ये! सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार
सरकार बदलल्यास नागपूर सुधार प्रन्यासचे काय होणार? कर्मचारी चिंतेत

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात अंदाधुंद परिस्थिती निर्माण झाली आहे. चुकीच्या पद्धतीने शासकीय आदेश काढण्याचा सपाटा राबविला जात असून, त्यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. तसे पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मागील आठवड्यात लिहिले होते. राज्यातील राजकीय स्थिती अत्यंत अस्थिरतेची बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि त्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनीषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान सुद्धा रिक्त केल्याचे माध्यमातून समजत आहे. अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे, असा आरोप दरेकर यांनी केला होता.

राज्यपाल कोश्यारी Action Mode मध्ये! सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार
लष्कराच्या निर्णयाने पुणे-मुंबई मार्गाचा श्वास मोकळा!अडीच किमीसाठी

कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहेत. १६० पेक्षा अधिक शासन आदेश ४८ तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पाच्या नावाखाली होत असलेला प्रकार संशय वाढविणारा आहे. पोलिस दल व महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपण तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद लावावा ही आपल्याला विनंती आहे, अशी मागणी दरेकर यांनी पत्रातून केली होती.

राज्यपाल कोश्यारी Action Mode मध्ये! सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार
मोर्णा नदी सौदर्यीकरणाचा विलंब पडणार 108 कोटींना

राज्यपालांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाल्या कारणाने ते चार दिवस खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. दोन दिवसांपूर्वी ते रुग्णालयातून राजभवनला परतले असून, कामकाजात पूर्ण सक्रिय झाले आहेत. राज्यपालांनी आता तीन दिवसांत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती मागवून त्याची शहानिशा केली जाणार आहे. एकंदरीत राज्यपालांच्या या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com