Chandrapur : 'या' प्रकल्पाचा बदलणार चेहरामोहरा; 88 कोटी निधी मंजूर

Chandrapur
ChandrapurTendernama
Published on

चंद्रपूर (Chandrapur) : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या कारगाव बु येथील पकडीगुडुम सिंचन प्रकल्पाचे भाग्य लवकरच उजळले जाणार आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील कोरडवाहू शेतजमीन ओलिताखाली येण्याची आशा फुलली आहे.

Chandrapur
Mumbai : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या 4 हजार कोटींच्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ; कोणी केला आरोप?

महाराष्ट्र शासनाने सिंचन सुधार कार्यक्रमांतर्गत राज्यातील 75 अपूर्ण प्रकल्पाचे नव्याने काम हाती घेण्याचे ठरवले आहे. यातील पहिल्याच टप्प्यातील प्रस्तावित प्रकल्पाच्या कामात पकडीगुड्डूम सिंचन प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या अनुषंगाने मुख्य कालवासह मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील 19 गावांच्या हद्दीतील लघु कालवे, वितरिका दुरुस्ती व पुनर्बाधणी आदी कामासाठी 88 कोटी 23 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पकडीगुड्डूम हा कोरपना व जिवती तालुक्याच्या सीमेवरील बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीसह प्रादेशिक नळ योजना, उद्योगाला पाणीपुरवठा केला जातो. परंतु प्रकल्पाच्या कल्पाच्या निर्मितीपासूनच अनेक कामे पूर्णत्वाने झाली नाही. त्यामुळे पुरेसे उद्दिष्ट हा प्रकल्प गाठू शकला नाही. 

Chandrapur
Pune : येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचे पाऊल

आज या प्रकल्पाच्या खोलीकरणासह कालवे दुरुस्ती, बुजलेल्या कालव्याची पुनर्बाधणी, कालव्यांची स्वच्छता, वेस्ट वेअर सुधारणा, प्रकल्प भिंतीची उंची वाढवणे, वन कायद्यात अडकलेल्या तांत्रिक बाबींच्या अडचणी, पर्यटनदृष्ट्या सौंदर्गीकरण, प्रकल्पस्थानी माहिती फलक लावणे आदी कामे होणे अपेक्षित होती. परंतु, ती होऊ न शकल्याने हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरला गेला. आता मात्र शासनाने मायेची फुंकर घातल्याने प्रकल्पातील काही कामांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता बळावली आहे. पकडीगुडुम सिंचन प्रकल्पाचा सिंचन सुधार कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातच समावेश करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या अनेक अपूर्ण कामांना गती मिळणार आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती पकडीगुडुम सिंचन प्रकल्प चे उपविभागीय अभियंता आमीर सय्यद यांनी दिली. सिंचन सुधार प्रकल्प कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पातील विविध सुधारणांचे प्रस्तावित काम होणार आहे. यासाठी आमच्या विभागातर्फे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया पकडीगुडुम सिंचन प्रकल्प ची शाखा अभियंता दीप्ती तेलंग यांनी दिली.

Chandrapur
Nagpur : एनआयटीमुळे अडले गुंठेवारी भूखंडांचे नियमितीकरण?

अशी आहे प्रकल्पाची तांत्रिक माहिती

पकडीगुड्डूम मध्यम सिंचन प्रकल्पाच्या कामाची सुरुवात सर्वप्रथम 1979 मध्ये झाली. त्यानंतर शासन व वन विभागाच्या विविध परवानग्या रखडल्याने तब्बल 13 वर्षे काम रेंगाळत राहिले. यातील काही परवानग्या मिळाल्यानंतर कसा बसा 1993 ला हा प्रकल्प पूर्णत्वास आला. मात्र, प्रत्यक्षात पाणी संचयन करून शेतीला सिंचनासाठी 1997-98 मध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या प्रकल्पाची जल संचयन क्षमता 111.03 दलघमी आहे. परंतु, आजघडीला प्रत्यक्षात 7.00 दलघमी पाण्याचे जलसंचयन होते. यातूनही नळ योजना, अंबुजा सिमेंट उद्योग यांना पाणीपुरवठा केला जातो. यातच पाण्याचा पुरेसा साठा शिल्लक राहत नाही. त्यामुळे मोजक्याच क्षेत्रातील शेतजमीन जलसिंचित होते. परिणामी लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकावरील वडगाव, लोणी, पारंबा या गावच्या शेत बांधावर कधीच पाणी पोहोचले नाही. याचबरोबर धरण कडेला असूनही धरणाला लागलेली शेतजमीन ही कोरडीच आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com