चांगली बातमी! मुंबईत 'हे' रुग्णालय ठरणार अनेकांसाठी वरदान, कारण...

Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. याठिकाणी 11 मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. नव्या इमारतीत 306 बेड्ससह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. सुमारे 300 कोटींचे बजेट असलेल्या या पुर्नविकासासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Mumbai
मुंबई ते हैदराबाद अवघे साडेतीन तासात; 'यामुळे' होणार शक्य

मुंबईतील केईएम, शीव, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह पूर्व-पश्चिम उपनगरात मुंबई महापालिकेची 16 सर्वसाधारण रुग्णालये आहेत. मुंबई महानगर प्रदेशापासून देशाच्या कानाकोपऱ्यांतून या रुग्णालयांमध्ये रुग्ण येत असतात. प्रमुख रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने उपनगरातील रुग्णालयांचा पुनर्विकास तसेच ती अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालयाचाही समावेश आहे.

Mumbai
Good News! 'लालपरी'चा लवकरच डिझेलला 'टाटा'; असा होणार बदल...

20 ते 25 वर्षांपूर्वी जोगेश्वरी ते मालाड पट्ट्यात महापालिकेचे रुग्णालय नव्हते. 1998 मध्ये गोरेगावमध्ये सिद्धार्थ रुग्णालय बांधण्यात आले. मात्र या सहामजली रुग्णालयाची वास्तू धोकादायक झाल्यामुळे 2019 मध्ये हे रुग्णालय बंद करून 2020 मध्ये रुग्णालयाची इमारत पाडण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून महापालिका प्रशासन कोरोनाच्या संकटाशी झुंजत असल्याने रुग्णालय उभारण्याला काहीसा उशीर झाला आहे. मात्र रुग्णालय बंद केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी नवीन रुग्णालय उभारण्याचा मुहूर्त साधण्यात प्रशासनाला यश आले आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत नवीन रुग्णालय उभे राहणार आहे.

Mumbai
तगादा : धक्कादायक! नागपूर जिल्ह्यातील २६ गावांत 'ही' समस्या

या रुग्णालयात पूर्वीप्रमाणेच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यात येणार असून, बेडची संख्या 306 वर पोहोचणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. तसेच यामुळे पश्चिम उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आयसीयू, ओपीडी, अपघात विभाग, मेडिकल, पेडियाट्रिक, गायनॅक ओपीडी, एक्स-रे, ईसीजी विभाग, ईएनटी, ऑप्थामॉलिजी, डेंटल, स्कीन ओपीडी, सीटी स्कॅन, डायलिसिस, पॅथॉलॉजी आदी वैद्यकीय सुविधा याठिकाणी मिळणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com