Good News: मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत; अशी करा नोंदणी..

MHADA
MHADATendernama
Published on

मुंबई (Mumbai) : गेल्या वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेली मुंबईतील म्हाडांच्या (Mumbai MHADA) ४०८३ घरांच्या सोडतीची तारीख जाहीर झाली आहे.

MHADA
नाशिककरांसाठी खूशखबर; इंडिगोची एक जूनपासून 29 शहरांना विमानसेवा

येत्या 18 जुलैला या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी 22 मेपासून इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरीवली, मालाड, दादर परिसरात म्हाडाची घरे असणार आहेत.

म्हाडाच्या 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. यात अत्यल्प - 2788, मध्यम- 132, उच्च - 38, विखुरलेली - 102 अशी घरे असणार आहेत. यासाठीची संपूर्ण जाहिरात ही 22 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर त्याच दिवसापासून इच्छुकांना नोंदणी देखील करता येणार आहे. तर अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 जून असणार आहे. रंगशारदा, वांद्रे, पश्चिम या ठिकाणी घरांची सोडत काढण्यात येणार आहे. आहे. घरांची सोडत 18 जुलै 2023 रोजी काढण्यात येणार आहे.

MHADA
Aditya Thackeray: 6 हजार कोटींचे भ्रष्ट 'मेगा रोड टेंडर' रद्द करा

26 जूनपर्यंत इच्छुकांना म्हाडाच्या या घरांसाठी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर स्वीकृती अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. यानंतर पात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 18 जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे.

अल्प गटासाठी गोरेगाव येथे घरे असल्याचे सांगण्यात आले आहे. अल्प गटातील घरांच्या किमती साधारण 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत आहेत. तर पहाडी भागातील घरांची किंमत साधारण 30 ते 44 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे. तसेच मध्यम गटासाठी 132 घरे असून ही घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर) कांदिवली येथील आहेत.

उच्च गटासाठी 39 घरे असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, शीव (सायन), शिंपोली, तुंगा पवई येथे असणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com