हार्बर रेल्वेमार्गावरून प्रवास करणारांसाठी गुड न्यूज; ३५०० कोटी..

Railway
RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : एमयूटीपी-3 (MUTP-3) अंतर्गत हार्बर रेल्वे मार्गाच्या विस्ताराची योजना आहे. यात कर्जत ते पनेवल मार्ग तसेच गोरेगावच्या पुढे बोरिवली पर्यंत विस्तार अशा दोन महत्त्वाच्या योजना आहेत. या दोन्ही प्रकल्पांवर सुमारे ३,५०० कोटींचा खर्च होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ या प्रकल्पांचे काम करत आहे.

Railway
दुष्काळात तेरावा महिना; चांदणी चौकातील पूल पाडण्यात आता ही अडचण...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव आणि पनवेल ते गोरेगाव अशी हार्बर सेवा सध्या सुरू आहे. लवकरच हार्बर सेवेचा आणखी विस्तार होणार आहे. हार्बर मार्गावरील लोकल मुंबईत बोरिवली पर्यंत जाणार आहे. यामुळे हार्बरच्या मार्गात मालाड, कांदिवली आणि बोरिवली अशा तीन स्थानकांची भर पडेल. या प्रकल्पासाठी सुमारे ७४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Railway
नाशिक : ६८२ अंगणवाड्यांना मिळेनात इमारती; कोण आहे जबाबदार?

मालाड येथे हार्बरसाठी एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म तयार करण्याची योजना आहे. यामुळे गोरेगाव ते मालाड - कांदिवली दरम्यानचा परिसर असा सुमारे तीन किलोमीटरचा मार्ग हा एलिव्हेटेड असेल. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव या मार्गावर मशिद बंदर - सँडहर्स्ट रोड दरम्यान एलिव्हेटेड मार्ग सुरू होतो. हा मार्ग किंग्स सर्कल - माहिम दरम्यान उतरतो. आता मालाडसाठी आणखी एक एलिव्हेटेड मार्ग झाला तर हार्बर मार्गावर दोन भागांमध्ये एलिव्हेटेड मार्ग होतील.

Railway
नाशिक जिल्ह्यातील 'ही' योजना मार्गी; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

हार्बर मार्गाच्या गोरेगाव ते बोरिवली या विस्ताराचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ करणार आहे. विस्तारामुळे हार्बरच्या मार्गात आणखी ७.०८ किलोमीटरची भर पडणार आहे. या विस्ताराकरिता तांत्रिक सर्व्हे झाले आहेत. प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन ते पाच वर्षात मार्ग सुरू होईल. प्रकल्पाचा खर्च ७४५.३१ कोटी रुपये असेल.

Railway
तुकडेबंदीचा निर्णय शिंदे सरकार उठविणार? खंडपीठाच्या निर्णयाने...

कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात मुंबई सीएसएमटी हा रेल्वे प्रवास पनवेल मार्गे करता येणार आहे. यामुळे कर्जतमधून थेट मुंबई सीएसएमटी येथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ किमान अर्ध्या तासाने कमी होईल. कर्जत ते मुंबई सीएसएमटी व्हाया पनवेल या प्रवासाकरिता पनवेल ते कर्जत असा नवा रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग २९.६ किमी अंतराचा आहे. सध्या कर्जत ते मुंबई सीएसएमटी हा प्रवास धीम्या गाडीने करण्यासाठी २ तास १९ मिनिटे लागतात. कर्जत ते मुंबई सीएसएमटी व्हाया पनवेल हा मार्ग सुरू झाल्यावर धीम्या गाडीने कर्जतहून सीएसएमटीपर्यंतचा प्रवास १ तास ५० मिनिटांचा होईल. साधारण अर्ध्या तासाची बचत होईल. या प्रकल्पासाठी २ हजार ७८३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या भूभागाचे सपाटीकरण सुरू आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ प्रकल्पाचे काम करत आहे.

Railway
एसटीवर का आली ताडपत्रीची 'चिकटपट्‍टी' वापरण्याची वेळ?

सध्या पनवेल आणि कर्जत यांना जोडणारा रेल्वे मार्ग एकेरी आहे. हा मार्ग खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. निवडक मालगाड्या आणि मोजक्या लांब पल्ल्याच्या गाड्या यांच्यासाठीच हा मार्ग वापरला जातो. आता हा मार्ग दुपदरी केला जाईल. नवा मार्ग जुन्या मार्गाला समांतर बांधला जाईल पण काही ठिकाणी मार्गात थोडा बदल असेल. सध्याच्या मार्गावर दोन बोगदे आहेत पण नव्या मार्गावर तीन बोगदे असतील. नधालजवळ २२० मीटरचा एक बोगदा असेल. दुसरा बोगदा २६०० मीटर लांबीचा असेल. तर तिसरा बोगदा वावराळे आणि कर्जत यांच्या दरम्यान असेल.

एमयूटीपी थ्री अंतर्गत हार्बर मार्ग तांत्रिकदृष्ट्या आणखी आधुनिक केला जाईल. बोरिवली ते विरार दरम्यान दोन अतिरिक्त मार्गिका तसेच सोळा स्टेशनांच्या आधुनिकीकरणाच्या योजनेचाही एमयूटीपी थ्री मध्ये समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com