भारतीय रेल्वेने जपानच्या बुलेट ट्रेनला टाकले मागे; 'वंदे भारत'ने

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

नवी दिल्ली (New Delhi) : येत्या ३० सप्टेंबरपासून तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) महाराष्ट्र-गुजरातदरम्यान धावणार आहे. देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. दरम्यान, स्वदेशी बनावटीची वेगवान रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेसने वेगाच्या बाबतीत जपानच्या बुलेट ट्रेनला देखील मागे टाकले. काही दिवसांपूर्वी केलेल्या चाचणीत वंदे भारत एक्स्प्रेस ही केवळ ५२ सेकंदात १०० किलोमीटर प्रतितास वेग गाठते तर जपानची बुलेट ट्रेन ही हाच वेग पकडण्यासाठी ५५ सेकंदाचा वेळ घेते.

Bullet Train
राज्य खड्डेमुक्त होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार; ५०० कोटी खर्च करणार

मुंबई ते गांधीनगर दरम्यान देशातील तिसरी आणि गुजरातमधील पहिली वंदे भारत सुरू होत आहे. त्यामुळे मुंबई ते गुजरात यादरम्यानचा प्रवासाला लागणारा वेळ हा वंदे भारत रेल्वेच्या वेगाने कमी हेाणार आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी या रेल्वेच्या उदघाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण दिले आहे. आठवड्यातील सहाही दिवस वंदे भारत रेल्वे धावणार आहे. यादरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत वंदे भारत रेल्वे १८० किलेामीटर प्रतितास वेगाने धावत असल्याचे दिसते. इतक्या वेगात रेल्वे धावत असतानाही ग्लासातील एक थेंबही पाणी सांडत नसल्याचे दिसते. या व्हिडिओत वंदे भारत रेल्वेचा वेग एका मोबाईल फोनच्या स्क्रिनवरील स्पिडोमीटरवर नोंदला आहे.या स्पिडोमीटरचे आकलन केल्यास १८० किलोमीटर प्रतितास वेगावरून १८३ किलोमीटर प्रतितास वेगाने वंदे भारत रेल्वे धावताना दिसते. रेल्वेच्या वेगाची चाचणी ही राजस्थानच्या कोटा ते नागदा रेल्वे स्थानकादरम्यान करण्यात आली होती.

Bullet Train
EXCLUSIVE : फडणवीसांच्या खात्यात भ्रष्टाचाराचे टोक;टक्केवारीसाठी..

वंदे भारत सेमी हायस्पीड
वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वे-१८ नावाने देखील ओळखले जाते. ही भारतातील पहिली सेमी हायस्पीड इंटरसिटी इएमयू रेल्वे आहे. मार्च २०२२ मध्ये दोन मार्गावर वंदे भारत धावते. पहिली रेल्वे दिल्लीहून श्री माता वैष्णोदेवी कटरासाठी धावते. तर दुसरी रेल्वे नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान जाते. आता मुंबई-गांधीनगरदरम्यान तिसरी रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल हेाणार होणार आहे. भारतात विकसित तयार केलेल्या या रेल्वेत सेल्फ प्रोपेल्ड इंजिन आहे. सर्व दरवाजे स्वयंचलित आहेत आणि कोचमधील खुर्च्या १८० अंशापर्यंत स्वत:भोवती फिरू शकतात.

Bullet Train
मुंबई-अहमदाबाद मार्गावर मिनी बुलेट ट्रेनचा थरार; वाचा सविस्तर...

जगातील वेगवान रेल्वे (किलोमीटर प्रतितास) (वेग २०२१ वर्षातील आहे)
शांघाय मेगलेव्ह (चीन): ४६०
सीआर-४०० फुक्सिंग (चीन): ३५०
आयसीई-३ (जर्मनी): ३३०
टीजीव्ही (फ्रान्स): ३२०
जेआर ईस्ट ई-५ (जपान): ३२०
अल बोराक (मोरोक्को): ३२०
एव्हीईएस-१०३ (स्पेन) : ३१०
केटीएक्स (दक्षिण कोरिया): ३०५
ट्रेनिटेलिया इटीआर-१००० (इटली): ३००
हेरामेन हायस्पीड रेल्वे (सौदी अरेबिया): ३००

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com