'BMC'च्या प्रशासकीय कारभाराची श्वेतपत्रिका काढा; शिंदेंकडे मागणी

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) गेल्या वर्षभरात हजारो कोटी रुपयांची कंत्राटे आणि प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, मात्र त्याबाबतचे एकही मसुदापत्र सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. कोणते प्रकल्प राबविण्यात येत आहेत, कोणते कंत्राट आणि किती किंमतीला देण्यात आले आहेत, हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही. दबावाखाली मुदत ठेवी मोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रशासकाच्या माध्यमातून महानगरपालिकेत सुरू असलेला गोंधळ थांबवावा आणि संपूर्ण कारभाराची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी माजी नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

BMC
फडणवीसांच्या लाडक्या योजनेचे कमबॅक; मंत्रिमंडळाचा 'ग्रीन सिग्नल'

मुंबई महानगरपालिकेत गेल्या वर्षभरापासून बसलेल्या प्रशासकाच्या मनमानी कारभारामुळे कारभारात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. अनावश्यक आणि मनमानीपणे वारंवार केल्या जाणाऱ्या बदल्या, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि वित्तीय बेशिस्तीमुळे संपूर्ण कारभारच कोलमडला आहे. त्यामुळे महापालिकेच्या लौकीकालाच बाधा पोहोचत आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई महानगरपालिकेतील गोंधळ थांबवा आणि कारभाराची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत या पक्षांच्या ९४ माजी नगरसेवकांच्या सह्या असलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

BMC
दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त; सुशोभीकरणाच्या ५०० कामांचे भूमिपूजन

मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपल्यापासून आतापर्यंत सुमारे वर्षभर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. मात्र प्रशासकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कारभारात सुसूत्रता नसल्याचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हजारो कोटी रुपयांची कंत्राटे आणि प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, मात्र त्याबाबतचे एकही मसुदापत्र सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. वित्तीय प्रकरणांचा विचार करता संपूर्ण कारभार गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. विविध पक्षातील माजी नगरसेवकांनी सातत्याने विनंती करूनही त्यांना मसुदापत्र पुरवण्यात आलेले नाही. परिणामी कोणते प्रकल्प राबविण्यात येत आहेत, कोणते कंत्राट आणि किती किंमतीला देण्यात आले आहेत, हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे प्रशासनाकाच्या माध्यमातून महानगरपालिकेत सुरू असलेला गोंधळ थांबवावा आणि संपूर्ण 'कारभारा'ची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही माजी नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर माजी महापौर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवी राजा, राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव, 'सपा'चे माजी गटनेते आमदार रईस शेख यांच्यासह ९४ नगरसेवकांच्या सह्या असलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

BMC
आऊट गोईंग बंद, इनकमींग सुरू; 70 हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता

अधिकाऱ्यांच्या मनमानी बदल्या सुरू आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. शिवाय बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता आहे. अर्थसंकल्पीय भाषणाचा भागही नसलेल्या विषयासाठी 6 हजार कोटींपर्यंत निधी देण्यात येत आहे. दबावाखाली मुदत ठेवी मोडल्या जात आहेत. माजी नगरसेवकांना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रशासकांची भेट घेणे मुश्कील बनले आहे. शिवाय प्रशासकाच्या मनमानीपणामुळे अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोपही माजी नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक परंपरा आणि वारसा असलेल्या महापालिकेच्या लौकिकाला धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com