ई-बसच्या टेंडरमध्ये कुणासाठी नियम बदलले? शिवसेनेवर गंभीर आरोप

E Buses
E BusesTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील इलेक्ट्रिक बसेसच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी शिवसेनेवर केला आहे. इलेक्ट्रिक बससाठी टेंडर प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी, अंतिम मुदतीच्या दीड तास आधी नियम बदलले गेल्याचा खळबळजनक आरोप साटम यांनी केला आहे.

E Buses
EXCLUSIVE : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वेच्या मुहूर्ताला 'ग्रहण'

शिवसेना बीएमसीमध्ये भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबईतील इलेक्ट्रिक बसेसच्या टेंडरकडे लक्ष वेधले आहे. हे टेंडर जाणूनबुजून परदेशी कंपन्यांना अनुकूल बनवले गेले. त्यामुळे केंद्रीय दक्षता आयुक्तांना (CVC) पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी साटम यांनी केली आहे.

E Buses
'मिठी'च्या प्रदूषणाची 'मगरमिठ्ठी' कधी सुटणार?

शिवसेनेवर निशाणा साधत साटम म्हणाले की, हा पक्ष भ्रष्टाचारात गुंतला आहे, मात्र भाजप प्रत्येक वेळी त्यांचा पर्दाफाश करेल. “आदित्य सेना आतापर्यंत फक्त टेंडर प्रक्रियेत काही कंपन्यांची बाजू घेत होती. मात्र, आता त्यांनी अशाप्रकारे जाचक अटी फिरवल्याने परदेशी कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 25 एप्रिल रोजी, इलेक्ट्रिक बससाठी टेंडर प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी, त्यांनी अंतिम मुदतीच्या दीड तास आधी नियम बदलले. तुम्ही नियम कोणासाठी बदलत आहात, असा खडा सवालही साटम यांनी केला आहे.

E Buses
नागपूरला अनधिकृत बांधकामाचा पुन्हा विळखा

टेंडर प्रक्रियेतील बीएमसी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका घेत भाजप आमदार साटम म्हणाले, “अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही. महाविकास आघाडी सरकार या प्रकरणाची दखल घेणार नाही. त्यामुळे साटम यांनी सीव्हीसी आयुक्त सुरेश पटेल यांना पत्र लिहून संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. 25 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता, टेंडर सादर करण्याच्या अंतिम दिवशी कंत्राटदारासाठी पात्रता निकष बदलण्यात आला. टेंडरची अंतिम मुदत सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. बदललेले निकष विदेशी कंपन्यांच्या बाजूने आहेत आणि यामुळे नियमांचे उल्लंघन झाले आहे. सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निकष बदलल्यास कंत्राटदाराला सात दिवसांचा अवधी दिला जातो. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com