Eknath Shinde : एसटीच्या 5 हजार बस आता पेट्रोल ऐवजी धावणार 'या' इंथनावर

ST Bus
ST BusTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : देशातील पहिल्या एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस - LNG) इंधनावर रुपांतरीत करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या (MSRTC) वाहन प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी एलएनजी रुपांतरणामुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली आणि बसचे निरीक्षण केले.

ST Bus
Nashik : सिंहस्थामध्ये होणार 17 हजार कोटींची कामे; मंत्री महाजनांना आराखडा सादर

एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. महामंडळाकडे डिझेलवर चालणारे सुमारे १६००० प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो.

डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहे.

ST Bus
Nashik : बनावट कागदपत्रे प्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करा; विधानसभा उपाध्यक्षांच्या ZP सीईओंना सूचना

राज्य शासनाच्या उद्योग विभागाने राज्यास एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी मे. किंग्स् गॅस प्रा. लि. यांच्याबरोबर सामंजस्य करार (MOU)  केलेला असून त्यामध्ये परिवहनसाठी सुध्दा एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. निश्चितच महामंडळाचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे.  महामंडळाच्या सुमारे ९० आगारात एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.

ST Bus
Nashik : जिल्हा परिषदेला प्रतीक्षा निवडणूक जाहीर होण्याची; 135 कोटी खर्चाचे आव्हान

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, वैभव वाकोडे, मे. किंग्ज गॅस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद आझम कुरेशी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com