टक्केवारीसाठी प्रकल्प अडकवणे खपवून घेणार नाही; फडणवीसांची तंबी

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : विकासाच्या मार्गात कुणालाही अडथळा आणू देणार नाही. टक्केवारीसाठी प्रकल्प अडकवून ठेवणे खपवून घेतले जाणार नाही. लोकप्रतिनिधी असतील तर मुख्यमंत्र्यांना सांगा, अधिकारी असतील, तर लोकप्रतिनिधींना सांगा. पण, हे सगळे धंदे बंद झाले पाहिजेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना कंमिटमेंटने काम करावे लागेल. पैशाची कमतरता नाही. पण, चुकीच्या पद्धतीने टेंडर होता कामा नये, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis
धारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु; 'नैना'ची तिसरी मुंबई..

यशवतंराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी (२.०) चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी फडणवीस म्हणाले, आपल्याला दोन वर्षांत बदल करून दाखवायचा आहे. चांगल्या कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठल्याही अपेक्षा नाहीत. शहरीकरणाचा विकास झाल्यास रोजगार निर्मिती होईल. नवनवीन तंत्रज्ञान समोर येईल. चांगल्या स्टार्टअपला काम देण्याचा विचार केला पाहिजे.

Devendra Fadnavis
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर घडणार इतिहास; देशातील सर्वांत उंच...

फडणवीस म्हणाले, स्वच्छ महाराष्ट्र दोनचा शुभारंभ आपण करतो आहोत. जबाबदारी असलेल्यांच्या उपस्थितीत हे अभियान राबवित आहोत. विकासाच्या वाटेवर शहरीकरण वेगाने होत आहे. शहरीकरण थांबवू शकलो नाही. ते सुनियोजित करण्यासाठी धोरणांअभावी शहरे बकाल झाली. पाणी, कचरा, सांडपाणी अशा समस्या निर्माण झाल्या. स्वच्छ महाराष्ट्र टप्पा दोनमध्ये सर्व शहरे येणार आहेत. पुढच्या दोन-तीन वर्षांत संपूर्ण शहर बदलविता येणार आहेत. छोट्या शहरांचा फरफार्मन्स चांगला आहे. 512 शहरांमध्ये निधीची कमतरता नाही. परिवर्तनासाठी नवीन पद्धती आणाव्या लागतात. नवीन बिझनेस प्रॅक्टिसेस कराव्या लागतात. जनतेला विश्वासात घ्यावे लागते. लोकसहभागामुळे हे शक्य झाले, असे फडणवीस यांनी सांगितले. खासगी गुंतवणूक आणता येणार आहे. नागपूरला प्रयोग केला. सांडपाण्यावर प्रक्रिया केली. वीज निर्मिती केली. सांडपाणी ही आता ऍसेट आहे. त्याचा फायदा घेतला पाहिजे. सरकारी यंत्रणेत खासगी सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

Devendra Fadnavis
मंत्रालयात मोठा खांदेपालट; वल्सा नायर सिंह यांच्याकडे हौसिंग, तर..

स्वच्छता आणि स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ बनणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. येत्या 90 दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचे अभियानही हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करून शहराचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत 450 रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० या अभियानाच्या उद्धिष्ट प्राप्तीसाठी राज्य शासनाने १२, ४०९ कोटीचा आराखडा मंजूर केला असून या अभियानातंर्गत सन २०२६ पर्यंत वैयक्तिक शौचालये १,८८, ३३४, सामुदायिक शौचालये १६,९०५ सीट्स, आकांक्षी शौचालये ३,२२८ सीट्स सार्वजनिक शौचालये ४,२९२ सीट्स व ६,८३० मुताऱ्या बांधण्यात येणार आहेत. वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन या घटकात १०,०५६ कि.मी. भूमिगत गटाराची बांधणी, नाला अडवणे व वळवणे, यामध्ये नाले १८२३ कि.मी. व १६५६ द. ल. प्र. दि. इतक्या क्षमतेचे मल जल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १०० टक्के प्रक्रिया करणे, सर्व जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, वाॅररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com