डिजिटल पेमेंट सुसाट; मे महिन्यात विक्रमी ५९५ कोटींचे व्यवहार

Digital Payment
Digital PaymentTendernama
Published on

नवी दिल्ली (New Delhi) : देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वेगाने वाढत असून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवर (युपीआय) (UPI) मे महिन्यात विक्रमी ५९५ कोटी व्यवहार नोंदवले गेले आहेत. या व्यवहारांचे मूल्य १० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एप्रिलमध्ये व्यवहारांचे प्रमाण ५५८ कोटी होते, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिली आहे.

Digital Payment
नगरनंतर आता 'शिवाई' ई-बस धावणार पुण्यातून 'या' शहराकडे

२०१६ मध्ये सुरुवात झाल्यापासून, युपीआयला चांगला प्रतिसाद मिळत असून कोविड-१९ महासाथीच्या काळात त्याला अधिकच चालना मिळाली. साथीच्या सुरवातीच्या काळात मार्च २०२० मध्ये २.०६ लाख कोटी रुपये मूल्याचे १२४ कोटी व्यवहार झाले होते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये युपीआय व्यवहार मूल्याने एक ट्रिलियनचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. तर मे २०२२ मध्ये मे २०२१च्या तुलनेत, मासिक व्यवहारांच्या संख्येत ११७ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि व्यवहारांचे मूल्य मागील वर्षातील ५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत दुप्पट झाले आहे,असेही एनपीसीआयने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Digital Payment
कंत्राटदारासाठी पदाधिकारीच भिडले; ‘खेळणी’ खरेदीसाठी एवढे टेंडर

युपीआय, रुपे, भारत बिल पे अशा अनेक डिजिटल पेमेंट सुविधा

हाताळणाऱ्याने एनपीसीआयने येत्या दोन ते तीन वर्षांत दररोज एक अब्ज डॉलर मूल्याचे युपीआय व्यवहार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फीचर फोनवर युपीआय सुविधा सक्षम करणे आणि स्मार्टफोनसाठी ऑफलाइन स्थितीत ही सुविधा उपलब्ध करणे अशी दोन उद्दीष्टेही एनपीसीआयने ठेवली आहेत. त्यादृष्टीने फीचर फोनसाठी युपीआय १२३ पे या सुविधेची चाचणी केली जात असून ऑफलाइन सुविधेसाठी युपीआय लाईटबद्दल परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या बाजारपेठेतील मोठा हिस्सा फोन पे, गुगल पे आणि पेटीएम पेमेंट्स बँक यांच्याकडे आहे.

मासिक व्यवहारांमधील हिस्सा

फोन-पे - ४७ टक्के

गुगल पे - ३५ टक्के

पेटीएम - १५ टक्के

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com