Devendra Fadnavis: वर्धा जिल्ह्यासाठी गुड न्यूज! वस्त्रोद्योगात 750 कोटींची गुंतवणूक

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे. ओफएबी टेक प्रा. लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास 25 हजार कोटींची उलाढाल आहे. या कराराच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा) एमआयडीसीत 750 कोटी गुंतवणूक करून जवळपास 15 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
BMC Tender: गरज नाही तिथेही काँक्रिटचे रस्ते कशासाठी? 'ते' 1600 कोटींचे टेंडर रद्द करा

फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान मेघदूत येथे वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाचा मे. ओफए बी टेक प्रा. लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला. वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी करण्यात आलेल्या करारामुळे वस्त्रनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल, स्वस्त वीज, दळणवळणाच्या सोयी-सुविधा व अल्प दरात उपलब्ध औद्योगिक भूखंड यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित वर्धा जिल्ह्यात नवीन उद्योगांना बळकटी मिळून रोजगार निर्माण होणार आहे.

Devendra Fadnavis
Mumbai Metro: पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवासाचे मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण! दर साडेसहा मिनिटांनी...

या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील महिला कारागिरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून हब ॲण्ड स्पोक मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच कच्चा माल आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे व त्याचा वापर उद्योगात होईल, त्याचबरोबर या उद्योगामुळे भागातील आर्थिक उन्नती देखील मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येईल.

यावेळी औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सचिव विरेंद्र सिंग, तसेच मे. ओफए बी टेक प्रा. लिमिटेड कंपनीचे अशिश मोहपात्रा, योगेश मंदानी, राजेश चावडे, विक्रम सिंग, अनुराग सोनी व एल. एल. सोनी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com