Devendra Fadnavis: डबेवाल्यांचे घरांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार; 'त्या' 12 हजार घरांबाबत फडणवीसांनी काय केली घोषणा?

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजबांधवांसाठी 12 हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे 60 वर्षांपासूनचे स्वप्न येत्या 3 वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिली.

Devendra Fadnavis
Tendernama Exclusive: राज्यात मनरेगाच्या अंमलबजावणीत सावळा गोंधळ; केंद्र सरकारचे 'रोहयो'च्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात यासंदर्भातील आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता यानिमित्ताने होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत ही घरे बांधली जाणार असून म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार असून, नमन बिल्डर ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर हे काम करणार आहेत. यातून 12 हजार घरांची निर्मिती होणार असून, ती डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध होणार आहेत.

प्रत्येकी 500 चौरस फूट आकाराचे घर केवळ 25 लाखात यामुळे दिले जाणार आहे. डब्बेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न हे येत्या 3 वर्षात पूर्ण होणार आहे.

Devendra Fadnavis
Tendernama Exclusive: राज्यात 'रोहयो'च्या योजनांची 'टॉप टू डाऊन' उलटी गंगा; सिंचन विहिरींवर तब्बल 1,056 कोटींचा खर्च..

आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत. वारकरी वारसा त्यांनी कधीही सोडलेला नाही. आपले तत्त्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत आणि म्हणूनच ते व्यवस्थापनातील अतिशय उत्कृष्ट मॉडेल आहे. या घरांसाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com