Navi Mumbai : स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावावर कोट्यवधींचा चुराडा

टेंडरशिवाय कामे केल्याचा आरोप
Swachh Bharat Mission
Swachh Bharat MissionTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई शहरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याची टीका होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहर आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक भिंतीला आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. मात्र, या कामाची टेंडर निघाले नसल्याचे पुढे आले आहे, अनेक कामे ठेक्याशिवाय दिली असून केवळ तांत्रिक बाबींच्या आधारे कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामात पारदर्शकता दिसत नाही. केवळ शहराला आकर्षक दिसण्यासाठी रंगरंगोटीवर करोडो रुपयांचा चुराडा करणे कितपत योग्य आहे असा सवाल केला जात आहे.

Swachh Bharat Mission
Eknath Shinde : नालेसफाईची पाहणी; कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर...

दरम्यान, आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत, काही कामांना तांत्रिक मान्यता दिली आहे. काहींची टेंडर निघाली आहेत, अशी कबुली त्यांनी दिली. तसेच काही गैर असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती सुद्धा आयुक्तांनी दिली. शहरात अनेक ठिकाणी अशा भिंती आहेत, ज्यांचे आधीचे रंग चांगले असताना पुन्हा त्याच भिंतीना रंग लावले जात आहेत, त्यामुळे केवळ सुंदरतेचा आव आणण्यासाठी पुन्हा त्याच भिंती रंगवल्या जात आहे, ज्यांचे आधीचे रंग चांगले आहेत, एका बाजूला पावसाळा अगदी तोंडावर आहे, त्यामुळे या पुन्हा रंगवलेल्या भिंतींचे रंग किती टिकतील ते पावसाळ्यात खराब होणार नाहीत का? त्यामुळे याला भ्रष्टाचार नाही तर काय म्हणायचे? असा सवाल माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी केला आहे. या संपूर्ण कामाचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

Swachh Bharat Mission
Mumbai-Goa Highway: परशुराम घाटातील 'तो' अवघड अडथळा दूर

नवी मुंबईत अनेक ठिकाणी हे चित्र आहे, त्यामुळे महापालिकेच्या या कारभारावर संशय येत असून याची चौकशी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत, काही कामांना तांत्रिक मान्यता दिली आहे. काहींचे ठेके निघाले आहेत, अशी कबुली यावेळी त्यांनी दिली. तर काही गैर असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती सुद्धा आयुक्तांनी दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

Swachh Bharat Mission
Mumbai : शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र वाटप योजना अपारदर्शक

"स्वच्छ भारत मिशन" अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण 2022" मध्ये नवी मुंबई शहरास देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर आहे. नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियम येथे आयोजित 'स्वच्छ अमृत महोत्सव' भव्य समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते, नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने माजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्वीकारला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com