मुंबई (Mumbai) : कोविड (Covid 19) काळात मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) जाहिरात बाजीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला कमालीचा फटका बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा निम्मेच उत्पन्न मिळाले आहे.
सार्वजनिक ठिकाणी बॅनर, पोस्टल लावण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. त्याबदल्यात महापालिकेकडून शुल्कही वसुल केले जाते. महापालिकेच्या संपूर्ण उत्पन्नाच्या तुलनेने हे उत्पन्न फारच कमी आहे. मात्र,2019-20 च्या तुलनेने यंदाच्या उत्पन्नात तब्बल 80 कोटी रुपयांची घट झाली आहे. महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. राजकीय सभा, नेते मंडळींचे वाढदिवस, व्यवसायिक जाहिरात, धार्मिक कार्यक्रम यासाठी जाहिरातीसाठी यासाठी महापालिकेकडून वेगवेगळे शुल्क आकारले जाते. तसेच जाहिरातीचा कालावधी, बॅनरचा आकार यानुसारही दर ठविण्यात आले आहेत.
घटता महसुल
2018-19--147
2019-20---163
2020-21---89
डिजिटल जाहिरातबाजीवर भर
मुंबईत मोक्याच्या ठिकाणी मोठ्या जंक्शनवर तब्बल 1 हजार 107 कायमस्वरुपी होर्डिंग आहेत. खाजगी जागा असली तरी त्या ठिकाणी जाहिरातबाजी करण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी गरजेची आहे. म्हाडा, एमएसआरडीसी, बीपीटी, विमानतळ प्राधिकरण कोणाचीही जागा असली तरी परवानगी महापालिकेकडून घेण्यात येते. सध्या या मोठ्या होर्डिंगवर पेंटींग, छपाई केलेली जाहिरात दिसून येते. परंतु आता डिजिटल युग असून यापुढे मोठ्या होर्डिंगवर डिजिटल पद्धतीने जाहिरात प्रदर्शित करावी, अशा सूचना जाहिरातदारांना करण्यात येणार असल्याचे महापालिकेचेही सांगण्यात आले.