'मुंबई महापालिकेच्या गृह योजनेत १ हजार ८४४ कोटींचा भ्रष्टाचार'

सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेस , राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याचा आरोप
BMC
BMCTendernama
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेकडून सफाई कामगारांसाठीच्या घरांच्या योजनेत सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेस , राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून १ हजार ८४४ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि मुंबई पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.

BMC
आश्चर्यच! मुंबईतील २५ हजार कोटींच्या रस्त्यांचा मालक सापडेना?

या घोटाळ्याची राज्य सरकारने चौकशी करावी अन्यथा केंद्रीय दक्षता आयोग, लोकायुक्तांकडे तक्रार केली जाईल तुझेच वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल,असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला. मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतून मालकी हक्काची घरे देण्यात यावीत अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनेकडून सफाई कामगारांना मालकीची घरे देण्याऐवजी आश्रय नावाच्या योजनेखाली सेवा निवासस्थानात ढकलण्याचे उद्योग सुरु आहेत. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याऐवजी आश्रय योजनेतून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे प्रकार सुरु आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला.

BMC
टेंडरनामाची दखल; चित्रा वाघ म्हणतात, ठग्ज ऑफ बीएमसी कोण?

१९८५ मध्ये लाड - पागे समितीने मुंबईतील सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याची शिफारस केली होती. या योजनेत बांधल्या जाणाऱ्या घरांचा खर्च राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने करावयाचा आहे. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना १३० कामगारांना घरे दिली गेली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीही मुंबईतील सफाई कामगारांसाठी नवी गृह योजना राबविण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतून घरे बांधण्याचाच निर्णय घेतला. मात्र मुंबई पालिकेत सत्तेत असलेली शिवसेना आश्रय योजनेखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम करीत आहे. या योजनेखाली दिल्या गेलेल्या कंत्राटांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री , मुख्य सचिवांकडे केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com