आरेच्या १ हजार एकर जागेवर कुणाचा डोळा? 'याचसाठी केला अट्टाहास'

Bhai Jagtap
Bhai JagtapTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथे मेट्रो कारशेड प्रकल्प उभारल्यास राज्य सरकारला 1 हजार 200 कोटी रुपयांचा फायदा होईल असा पर्यवरणतज्ज्ञांचा अहवाल आहे. पण तरीही नव्या सरकारने आरेच्या सुमारे १ हजार एकर जागेचा बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी कांजूरमार्गऐवजी आरेमध्ये कारशेड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केला.

Bhai Jagtap
मुंबई महापालिका 'आरे' कॉलनीत बांधणार Animal Friendly Road

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गऐवजी आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये हा प्रकल्प उभारण्यास विरोध केला आहे. काँग्रेसनेही आरेमध्ये प्रकल्प उभारण्यास विरोध केला आहे. मेट्रो कारशेडविरोधात मुंबई काँग्रेसने 'मुंबई बचाव, आरेतून मेट्रो कारशेड हटाव' आंदोलन पुकारले.

Bhai Jagtap
शिंदे सरकार जोमात; ज्या कारणासाठी बंड केले त्याची प्रतीपूर्ती सुरु

आरेमधील जंगल हा मुंबईचा श्वास आहे आणि मुंबईच्या पर्यावरणाचे फुप्फुस आहे. कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्पाची एक हजार तीन एकर जागा बिल्डरांच्या फायद्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गऐवजी पुन्हा आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप भाई जगताप यांनी केला.

Bhai Jagtap
मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत 'या' मोठ्या प्रकल्पाची घोषणा

भाई जगताप पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईकरांच्या जीवावर उठले होते आणि आता उपमुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहेत. आरेतील ३३ एकर जागा या कारशेड साठी फडणवीसांनी प्रस्तावित करून ठेवली होती. या ३३ एकर जमिनीवरील २२०० झाडे आजतागायत तोडण्यात आलेली आहेत. उर्वरित जमिनीवरील झाडेही नष्ट करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आरेमधून मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलविल्यास सरकारला ५००० कोटी रुपयांचे नुकसान होईल. पण त्यांचा हा दावा अतिशय तथ्यहीन आहे. कारण आरे कारशेड कांजूर मार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेताना पर्यावरण तज्ज्ञांनी जो अहवाल दिला होता. त्यानुसार कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड प्रकल्प उभारल्यास सरकारला नुकसान न होता उलट १२०० कोटी रुपयांचा फायदा होईल.

Bhai Jagtap
मुख्यमंत्र्यांचे ठाण्याला पहिले गिफ्ट; सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे

देवेंद्र फडणवीस आरे येथे मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्यासाठी यासाठी आग्रही आहेत व बालहट्ट करत आहेत. कारण त्यांचा कांजूरमार्ग येथील आरेसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १००३ एकर जागेवर डोळा आहे, ज्यातील ६०० एकर जागा ही राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहे व उर्वरित केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. ही सर्व जमीन सरकारचेच पैसे वापरून त्यांना गरोडीया बिल्डर व कल्पतरू बिल्डर यांच्या घशात घालायची आहे. हे एक खूप मोठे षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीस बिल्डरांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प करत आहेत. ते स्वतः नागपूरला राहतात. त्यामुळे त्यांना मुंबई व मुंबईकरांची अजिबात काळजी नाही. पण मुंबई काँग्रेस असे होऊ देणार नाही. बिल्डरांची दलाली करण्यासाठी मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्यासाठी आरेतील जंगलाचा बळी देऊन मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रातील भाजप सरकारने जर केला, तर आम्ही त्यांचे प्रयत्न हाणून पाडू. यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही भविष्यकाळात करू पण आरेला आम्ही नष्ट होऊ देणार नाही. मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी खासदार संजय निरुपम, माजी पालकमंत्री अस्लम शेख, आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव व अभिनेत्री राखी सावंत यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाला कडाडून विरोध केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचा धिक्कार केला. जोपर्यंत आरेतून मेट्रो कारशेड प्रकल्प जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com