ठाण्यातील 'या' कार्यालयांचा पुनर्विकास वेगात करा : मुख्यमंत्री

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या कार्यालयाच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Eknath Shinde
ठाण्यावर शिंदे 'प्रसन्न'! 'या' 3 योजनांना 4,700 कोटींचा बूस्टर

ठाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील या दोन कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येत असून त्याचा गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम आणि तहसील कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात येत आहे. या कार्यालयांच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव सरकारकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

Eknath Shinde
शिंदे सरकारकडून आदित्य ठाकरेंच्या स्वप्नांचा भंग;पर्यटन स्थळांच्या

शिंदे म्हणाले, पुनर्विकास करताना ठाणे महापालिकेने सर्व शासकीय कार्यालयाना आता असलेल्या जागेपेक्षा किमान दुप्पट जागा मिळेल असे नियोजन करावे. वाहन तळाची व्यापक व्यवस्था करावी, आराखड्यात तसे नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
ठाणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय अधिकारी- कर्मचारी वसाहतीचे पुनर्विकास करण्यासाठीदेखील प्रस्ताव सादर करावा. तेथील काही जागा बस टर्मिनलसाठी ठाणे महापालिकेस देता येईल का याचाही विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या कार्यालयांचे नुतनीकरण करताना या कार्यालयात काळानुरूप सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. नूतनीकरणाचे काम करताना या कार्यालयाच्या जवळ असणाऱ्या कन्या शाळेत ही कार्यालये स्थलांतरित करण्यात यावीत, जेणेकरून नूतनीकरण करताना कोणतेही कार्यालय बंद राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Eknath Shinde
ठाणे जिल्ह्यावर मुख्यमंत्री पुन्हा मेहरबान; 336 कोटींचा निधी...

ठाणे जिल्ह्यातील सागरी महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असून जमीन मालकांना १०० टक्के मोबदला देण्यासाठी महसूल, नगरविकास आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्रित आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाने अपर मुख्य सचिव राजेशकुमार, प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com