दरड कोसळण्याच्या घटनांवर IIT Mumbai सूचविणार उपाय : CM शिंदे

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली.

Eknath Shinde
खड्ड्यांप्रकरणी CM शिंदे ऍक्शन मोडमध्ये; मास्टिक पद्धतीने खड्डे...

या महामार्गावर ९ कि.मी. चे घाट क्षेत्र असून या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना सूचविण्यास आयआयटी मुंबईला सांगितले आहे आणि त्यांनी काम सुरू केले आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde
Mumbai: कष्टकरी कामगारांच्या नावाने कंत्राटदारांनीच लाटला ‘मलिदा’

दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या ठिकाणच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संरक्षण जाळी लावली असून हा परिसर सुरक्षित केला आहे. कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. ज्या ठिकाणी डोंगराचा भाग धोकादायक असेल तो भाग पाडून त्या ठिकाणी संरक्षक जाळी टाकून हा भाग सुरक्षित करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com