Eknath Shinde : दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. याकरिता  महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान असणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde
Dharavi Redevelopment : रहिवाशांना मिळणार 350 स्के. फूटचे घर; नाराजी दूर करण्यासाठी वाढीव क्षेत्रफळ?

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून प्रयाण झाले. तत्पूर्वी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे, महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग झाले पाहिजे, यासाठी दावोस येथे चांगली संधी आहे. आज जगभरातील लोक महाराष्ट्राकडे अपेक्षेने पाहत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. यावेळी मागील वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात करार होऊन जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रात होईल. यामुळे प्रमुख शहरांसोबतच ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगांसाठी सवलतीचे धोरण असल्याने दावोस येथील उद्योजक गुंतवणूक करण्यास तसेच उद्योग सुरू करण्यास आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले.

Eknath Shinde
Mumbai : 'या' महापालिकेचे एसटीपी प्रकल्पासाठी साडेचारशे कोटींचे टेंडर

या सरकारच्या काळात महाराष्ट्र हे परकीय थेट गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आले आहे. गेल्यावर्षी या परिषदेत एक लाख ३७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. आता यापेक्षाही जास्त प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणुकीचे करार केले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह १० जणांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. तसेच केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात आठ जणांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com