गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोची बंपर योजना; 4,158 घरे...

CIDCO
CIDCOTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सिडको महामंडळातर्फे, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील 6 कार्यालये व त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी जाहीर केली.

CIDCO
बुलेट ट्रेनसाठी शिंदेंचा धडाका; भूसंपादन, मोबदला 30 सप्टेंबरपूर्वी

महागृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परवडणार्या दरातील या 4,158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3,754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा 6,00,000 तर अनुदानाची रक्कम 2,50,000 निश्चित करण्यात आली आहे.

CIDCO
अखेर नागपूर विद्यापीठाला आली जाग; ‘एमकेसीएल’चे टेंडर रद्द

सिडको सातत्याने घरे, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची (कमर्शियल प्रिमाईसेस) विविध योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना विक्री करते. ज्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात मदत होण्यासोबतच नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता वृद्धिंगत होऊन शहराच्या आर्थिक विकासासही हातभार लागतो. नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना या योजनांची घोषणा करून डॉ. संजय मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर असलेल्या नवी मुंबईत नागरिक, व्यापारी आणि विकासक यांना त्यांची घरे, कार्यालये, व्यावसायिक गाळ्यांची मालकी मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

CIDCO
मुंबई : १ हजार किमीच्या नवीन वीजपुरवठा केबल; ३५०० कोटींचे बजेट

नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इ. सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत. इतर योजनांतर्गत सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी 3 याप्रमाणे एकूण 6 कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तारांकीत हॉटेलसाठी 1, निवासी वापरासाठी 64 तर निवासी तथा वाणिज्यिक वापरासाठी 5 भूखंड विक्रीकरीता उपलब्ध आहेत. या योजनांच्या सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज नोंदणीपासून ते सोडती पर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पार पडणार आहेत. योजनांसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com