'या' कारणामुळे रखडले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ?

Navi Mumbai International Airport
Navi Mumbai International AirportTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (Navi Mumbai International Airport) बाधित होणाऱ्या 10 गावांमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन खोळंबल्याने विमानतळाचा प्रकल्प गेल्या 10 ते 12 वर्षापासून रखडलेला होता. मात्र आता जवळपास 99 टक्के गावकऱ्यांचे यशस्वी पुनवर्सन करण्यात सिडकोला (Cidco) यश आले आहे. परिणामी येत्या १ जानेवारीपासून विमानतळाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती येणार आहे.

Navi Mumbai International Airport
पुणे–सातारा रस्त्यावर रिलायन्सकडून २ हजार कोटींची बेकायदा टोलवसुली

नवी मुंबई आणि पनवेलच्या मध्यभागी तीन हजार एकर जागेत सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करीत आहे. यासाठी जवळपास 20 हजार कोटी रूपये खर्च येणार असून तीन हजार कोटींची कामे सिडको करणार आहे. तर 17 हजार कोटी रूपयांची कामे अदानी कंपनी करणार आहे. सध्या सिडकोने सर्वात मोठा अडथळा ठरत असलेल्या येथील 10 गावांचे पुनवर्सन पूर्ण केले आहे. येथील गावकऱ्यांना दिलेल्या जमिनीच्या बदल्यात 22.5 टक्के विकसित भूखंड, तोडलेल्या घरांच्या जागेएवढी जमीन आणि बांधकाम करण्यासाठीचा खर्च, विमानतळाच्या कामामध्ये हिस्सा आणि नोकरीत प्राधान्य अशा विविध योजनेचा लाभ सिडकोकडून देण्यात आला आहे.

Navi Mumbai International Airport
'मुंबई महापालिकेत ठराविक कंत्राटदारांसाठीच होतात टेंडर फ्रेम'

सिडकोकडून गावकऱ्यांचे पुनवर्सन झाल्याने येथील भरावाचे काम अंतिम टप्यात आले आहे. विमानतळाच्या जागेतून जाणाऱ्या नदीला वेगळी वाट करून देणे, उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करणे आणि डोंगराचे सपाटीकरण करणे या कामांची जबाबदारी सिडकोच्या अखत्यारीत होती. यातील जवळपास सर्व कामे सिडकोने संपवत आणली असून पुढील विमानतळ उभारण्याची कामे अदानी ग्रुपला करावी लागणार आहेत. या आधी जीव्हीके कंपनीने विमानतळाची उभारणी करण्याचे काम घेतले होते. मात्र सदर कंपनीचे आर्थिक कंबरडे मोडल्याने अदानी ग्रुपकडे विमानतळाच्या कामाचे हस्तांतरण करण्यात आले आहे. ऑगस्टपासून अदानी ग्रुपकडून काम हाती घेण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 1 जानेवारीपासून खऱ्या अर्थाने अदानी ग्रुप विमानतळाच्या कामाला हात घालणार आहे.

Navi Mumbai International Airport
बापरे! मुंबई महापालिकेने कोविडमध्ये फ्रिज खरेदी केले एवढ्या दराने?

मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दीचा लोड आहे. वर्षाला जवळपास 6 कोटी प्रवासी देश-विदेशात मुंबई विमानतळावरून प्रवास करतात. हवाई ट्रॅफिक जाम होवू लागल्याने अखेर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 1 डिसेंबर 2024 रोजी पहिले विमान उडेल असे संकेत सिडको एमडी संजय मुखर्जी यांनी दिले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देश विदेशात जाण्यासाठी वर्षाला 60 लाखाच्या वर प्रवासी वापर करणार आहेत. त्याच बरोबर जेएनपीटी बंदर बाजूला असल्याने 1 लाख 50 हजार मेट्रीक टन कार्गो या ठिकाणावरून लोड होणार आहे. विमानतळ सुरु झाल्यावर 1 लाख थेट तर 2.5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती या विमानतळामूळे अस्तित्वात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com