ठाणे जिल्ह्यावर मुख्यमंत्री पुन्हा मेहरबान; 336 कोटींचा निधी...

Kalu Dam
Kalu DamTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्याला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (MMRDA) 336 कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. कल्याण मंडणगड-कुशिवली धरणाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी देखील यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

Kalu Dam
नागपूर रेल्वे स्थानक असे होणार हायटेक; 536 कोटींचे टेंडरही निघाले

ठाणे जिल्ह्यातील काळू धरणाच्या उभारणीसाठी मुरबाड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीतील 18 गावे आणि 23 पाड्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. तसेच वन विभागाची 999 हेक्टर जमीनही या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहे. या सर्व जमिनीच्या भूसंपादनासाठी एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 336 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत. ज्यायोगे भूसंपादन विहित वेळेत पूर्ण होऊन धरणाच्या कामाला गती येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Kalu Dam
शिंदेंचा मोठा निर्णय;MMRDAच्या प्रकल्पांना १२ हजार कोटींच्या हमीसह

काळू धरणातून 1140 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या धरणाच्या उभारणीमुळे ठाणे, भिवंडी निजामपूर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या शहरांची भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या धरणासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हे धरण वर्षभरात पूर्ण करावे, असे निर्देश दिले. या 10 एमएलडी क्षमतेच्या धरणामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा दाब वाढवण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीला केली. येत्या काही दिवसांत हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी बैठकीत स्पष्ट केले.

Kalu Dam
फडणवीस, गडकरींच्या नागपुरात भर पावसात का आली पाणीबाणी?

जांभूळ धरणातून शहाड शहराला पाणीपुरवठा होतो, या पाणीपुरवठा वाहिन्या अतिशय जीर्ण झाल्या असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होते, या वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी यावेळी केली. तसेच हा प्रश्न तातडीने मार्गी लावून पाणीपुरवठा नियमित करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. रवींद्र फाटक यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com