मध्य रेल्वेवर 'घारीची नजर' होणार आणखी अचूक; 900 कॅमेऱ्यांसाठी...

Railway
RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेवर (Central Railway) मुंबई विभागातील स्थानकांवर तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यात आता आणखीन 900 कॅमेर्‍यांची भर पडणार आहे. सध्या त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे चार हजार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या 'घारीची नजर' राहणार आहे.

Railway
पेट्रोल-डिझेल भरुनच ठेवा; डिलर्सचा ३१ मे रोजी ‘नो पर्चेस डे‘

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची हद्द रोहापर्यंत असून या मार्गावर एकूण तीन हजार सीसीटीव्ही यापूर्वीच बसविण्यात आले आहेत. तसेच आता आणखीन 900 सीसीटीव्ही बसविण्याची योजना आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय स्थानक आणि लांबपल्ल्याच्या स्थानकांवर एकूण 300 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यात आता नव्या टेंडर प्रक्रियेमुळे आणखीन 25 सीसीटीव्ही वाढून 325 सीसीटीव्ही होतील असेही मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Railway
लोकशाहीची मशाल कायम तेवत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका उभारणार...

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार्‍या ठिकाणी निगराणी ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची खूप मदत होत असते. तसेच अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ट्रेनमधून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी 100 शिड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रेन स्थानकापासून दूर असेल तर प्रवाशांची सुटका करण्यासाठी या शिड्या उपयोगात येतील असे म्हटले जात आहे. तसेच बदलापूर, अंबरनाथ, ठाणे, माटुंगा कारशेड, मस्जिद बंदर येथे रबरी बोटी तैनात ठेवण्यात येणार आहेत.

Railway
मध्य रेल्वेचे चौथे अत्याधुनिक कारशेड भिवपुरीत; भूसंपादन सुरु

मध्य रेल्वे सुरक्षा दलातील कॉन्स्टेबलच्या युनिफॉर्मवर बॉडी कॅमेरे बसविण्याची योजना असून 40 बॉडी कॅमेर्‍यांच्या खरेदीकरीता 24 लाखांचे टेंडर काढण्यात येणार आहे. युनिफॉर्मवर बॉडी कॅमेरा बसविल्याने लांबपल्ल्यांच्या ट्रेनमध्ये कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पुरावे जपून ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. तसेच रेल्वे स्थानक आणि परिसरात कमी वर्दळीच्या जागांवर प्रखर प्रकाशाचे दिवे लावण्यात येत असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com