मुंबई (Mumbai) : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने स्टेशन परिसरात प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप उभारण्याचा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. नॉन-फेअर रेव्हेन्यू उत्पन्न मॉडेल अंतर्गत ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी रेल्वेने हे टेंडर प्रसिद्ध केले असून या प्रस्तावित सिने डोममध्ये ग्राहकांसाठी जेवण, नाश्ता, पेय्यांसह नवीनतम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच नवीन माहितीपट आणि इतर सामग्री चित्रपट प्रदर्शित केले जातील.
सिने डोमचे व्यवस्थापन स्वतःच ऑपरेट करतील. तसेच गर्दीचे व्यवस्थापन करणे ही जबाबदारी परवानाधारकाची असणार आहे. प्री-फॅब्रिकेटेड सिने डोमची स्थापना, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन ही जबाबदारी पूर्णत: परवानाधारकाची असेल आणि त्यासाठी लागणारा खर्च परवानाधारकाला करावा लागेल त्यात उभारणीचा खर्च, प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम संबंधित वस्तू, संरक्षा आणि सुरक्षा, आवश्यक सुविधा, केबल टाकणे, विद्युत कनेक्शन, वीज वापर शुल्क, वीज जमा आणि इतर प्रासंगिक खर्च इ. समावेश आहे. स्टेशन परिसरात ५ हजार चौरस फूट जागा त्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
प्रतिवर्षी राखीव किंमत अशी आहे
डोंबिवली - रु. ४७,८५,४००/-
जुचंद्र - रु. ३५,८२,०००/-
इगतपुरी - रु. १७,१०,४००/-
खोपोली - रु. २३,३१,१००/-