कोल इंडियाचे २४ लाख मेट्रिक टन कोळसा आयातीचे टेंडर

coal
coalTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कोल इंडिया लिमिटेडने (Coal India Limited) देशातील वीज प्रकल्पांना पुरेसा इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 24.16 लाख टन कोळसा आयात करण्यासाठी पहिले टेंडर काढले आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे पुन्हा वीज कपात टाळण्यासाठी केंद्र सरकारने कोळशाचे साठे तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

coal
नागपूर मनपाकडून वर्षभरात अवघे २० किमी रस्ते दुरुस्ती; १७ कोटी खर्च

अलीकडेच केंद्र सरकारने कोळशाच्या आयातीबाबत राज्यांवर निर्बंध घातले आहेत. यापुढे राज्यांमधील वीज कंपन्यांनी परस्पर कोळसा आयात करू नये, तुम्हाला आवश्यक असलेल्या कोळशाची आम्हाला माहिती द्या, तो आम्ही कोल इंडियाच्या माध्यमातून मिळवून देऊ असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

coal
Good News! नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त ठरला! वाचा सविस्तर...

या धोरणानुसार कोल इंडिया लिमिटेडने बुधवारी पहिल्यांदाच 24.16 लाख टन कोळशाच्या आयातीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोलीसाठी ई-टेंडर काढले आहे. ज्यामध्ये 24.16 लाख टन कोळशाच्या आयातीसाठी टेंडर मागवण्यात आले आहे, असे कंपनीने म्हटले आहे. वीज निर्मिती कंपन्या (जेनकोस) आणि स्वतंत्र ऊर्जा प्रकल्प यांच्याकडून मिळालेल्या मागणीच्या आधारे कोळसा मागवला जाणार आहे. ही मागणी चालू आर्थिक वर्ष 2022-22 च्या जुलै-सप्टेंबर कालावधीसाठी आहे.

coal
मोठी बातमी! 'या' बलाढ्य कंपनीच्या खासगीकरणाचे टेंडर सरकारकडून रद्द

सीआयएलसाठी कोळशाची आयात हे नवीन काम आहे. कंपनीने सात राज्य वीज निर्मिती कंपन्या आणि 19 आयपीपीकडून इंडेंट प्राप्त केल्यानंतर एका आठवड्याच्या आत युद्धपातळीवर टेंडर जारी केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी कोरड्या इंधनाच्या आयातीसाठी सध्याच्या अल्प-मुदतीच्या टेंडर अंतर्गत कोणत्याही देशातून कोळसा खरेदी केला जाऊ शकतो.

coal
Nagpur ZPचा अजब कारभार; टेंडर खुले करण्यास 'लघुसिंचन'कडून टाळाटाळ

टेंडर स्वीकारण्याची अंतिम तारीख 29 जून आहे. सीआयएलने सांगितले की, टेंडर मधील कोणत्याही तपशीलावर स्पष्टीकरण मिळविण्यासाठी 14 जून रोजी टेंडरपूर्व बैठकीचा पर्याय आहे. बोली प्रक्रियेद्वारे निवडलेली एजन्सी जेनको आणि आयपीपीच्या वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा करेल. केंद्र सरकारने याआधी सीआयएलला पॉवर युटिलिटीसाठी पुढील 13 महिन्यांसाठी 1.2 कोटी टन कोळसा आयात करण्यास तयार राहण्याचे निर्देश दिले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com