Mumbai : 700 एसी डबलडेकर ई-बसेसचा पुरवठा करण्यास 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीचा नकार?

BEST
BESTTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : स्विच मोबॅलिटी कंपनी २०० तर कॉसिस कंपनी ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करणार होती. मात्र कॅसिस कंपनीने ७०० पैकी एकाही बसेसचा पुरवठा न केल्याने बेस्ट उपक्रमाला प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचण निर्माण झाली आहे. बसेसची अपुरी संख्या यामुळे प्रवाशांनाही बस थांब्यावर तासन‌्तास बसची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागत आहे.‌ दरम्यान, बस पुरविण्यात असफल ठरलेल्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे तसेच बस पुरवठ्यात नकार देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेस्ट समितीचे माजी सदस्य रवी राजा यांनी केली आहे.

BEST
Mumbai : हार्बर रेल्वेचा 'या' स्टेशनपर्यंत होणार विस्तार; पुढील महिन्यात 825 कोटींचे टेंडर

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३ हजार १० बसेसचा ताफा आहे. हा ताफा वाढविण्यासाठी बेस्टने फेब्रुवारी २०२२ मध्ये तत्कालीन बेस्ट समितीत ७ हजार बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला होता. तसेच बेस्ट'च्या ताफ्यात असलेल्या डबलडेकर बस गाड्यांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने प्रशासनाने नव्या 900 बसेस भाडेतत्त्वावर निर्णय घेतला आहे. यासाठी राबवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत बसेस 'स्विच मोबिलिटी ऑटोमोटीव्ह' आणि कॉसिस कंपनीने प्रतिसाद दिला. 900 इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसपैकी 200 बसेस 'स्विच मोबॅलिटी ऑटोमोटीव्ह'ने पुरवण्याची तयारी दर्शवली. तर 700 इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्याची तयारी 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीने दर्शवली. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून बसेसचा पुरवठा करण्यात उशीर झाला. आतापर्यंत स्विच मोबॅलिटी कंपनीने २०० पैकी ४९ बसेसचा पुरवठा केला आहे. तांत्रिक कारण पुढे करत 700 बसचा पुरवठा करणाऱ्या 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीने यापूर्वी सुद्धा नकार दिला होता. त्यामुळे 700 वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसेसच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर 'बेस्ट' प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यामुळे कंपनीने बस पुरवण्याची तयारी दर्शवली होती. आता पुन्हा या डबलडेकर बसेस पुरवण्यास कंपनीने नकार कळवल्याचे समजते आहे.

BEST
Mumbai : दहिसरच्या 'त्या' स्कायवॉकची पुनर्बांधणी कधी? ठेकेदाराकडून 30 कोटीत जुजबी मलमपट्टी सुरु

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या बसेसची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचण निर्माण झाली आहे. बेस्ट बसेसचा प्रतीक्षा कालावधी ३० ते ६० मिनिटांपर्यंत गेला आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना तिष्ठत उभे राहावे लागत आहे. डबलडेकर बसची ऑपरेशनल क्षमता 180 कि.मी. इतकी आहे. 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये या बस 100 कि.मी.पर्यंत धावू शकतात, तर संपूर्ण चार्जसाठी 80 मिनिटे लागतात. या बसची बॉडी अॅल्यूमिनियमपासून बनवलेली आहे. या एका बसची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. यातून 90 प्रवाशी प्रवास करू शकतात. या वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस मुंबईकरांच्या पसंतीस उतरल्या आहेत. मुंबईत लोकल आणि बेस्ट या मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जातात. वेगवान लोकलला सर्वाधिक पसंती दिली जात असली तरी बेस्टमधूनही हजारो लोक दररोज प्रवास करत असतात. बेस्टच्या ताफ्यात पूर्वीपेक्षा आधुनिक अशा डबलडेकर दाखल झाल्यामुळे बेस्टची शान वाढली आहे. सर्वांत स्वस्त प्रवास म्हणून बेस्ट बसना पसंती दिली जात असून पहिल्या पाच किलोमीटरचा गारेगार प्रवास फक्त सहा रुपयांत करता येतो. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटक या बसेसला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com