'त्या' दुर्घटनेप्रकणी ठेकेदारासह 9 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Landslide
LandslideTednernama
Published on

मुंबई (Mumbai) : गेल्यावर्षी अतिवृष्टीत परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाच्या अर्धवट कामामुळे दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ९ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai - Goa Expressway) चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या संचालकासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी आणि शाखा अभियंता अशा ९ जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. चिपळूण पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Landslide
खुशखबर! मुंबईतील 'ही' रेल्वे स्थानके होणार हायफाय; ९०० कोटींची...

मुसळधार पाऊस पडल्यास राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना गतवर्षी घडली होती. कोकणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने गावच्या गावे पाण्याखाली गेली होती. तसेच, चिपळूणमधील पेढे - कुंभारवाडी गावात गतवर्षी अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. गतवर्षी २२ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापुराचा फटका बसला होता.

Landslide
आदित्य ठाकरेंचे 'पर्यावरण' जाताच पुन्हा नागपुरकरांच्या जिवाशी खेळ

अतिमुसळधार पावसामुळे तालुक्यातील परशुराम घाटाखालील पेढे कुंभारवाडी येथील घरावर दरड खाली पडली. दरड पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेले काही वर्षे सुरू आहे. यामध्ये चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाचे काम चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. या अर्धवट कामाचा फटका घाटा खाली असलेल्या घरांना बसला. अर्धवट स्थितीत असलेल्या कामामुळे घाटातील दरड पेढे - कुंभारवाडी येथील घरांवर खाली आली आणि घरे क्षणांतच जमीनदोस्त झाली. त्यानंतर दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार केली होती.

Landslide
सीएनजी वाहनचालकांनो व्हा निश्चिंत! पुण्यात ६ ठिकाणी होणार नवे पंप

याशिवाय, कंपनी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करत गावकरी उपोषणालाही बसले. त्यानंतर गावकऱ्यांनी ॲड. ओवेस पेचकर यांच्यामाध्यमातून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी धडपड सुरू केली. त्यानंतर ॲड. पेचकर यांनी अशा स्वरुपातील गुन्हा दाखल करण्यासाठीचा मागणी अर्ज चिपळूण न्याय दंडाधिकारी यांच्याकडे देत न्यायालयीन लढा सुरू ठेवला. याप्रकरणी आता चिपळूण पोलिस स्थानकात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com