CAG: रस्ते कामात ठेकेदारांनी 'असा' मारला हात! 6 ठेकेदारांवर ठपका

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कॅगने (CAG) मुंबई महापालिकेच्या (BMC) कारभारात पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन तसेच निधीचा निष्काळजीपणे वापर केल्याचा ठपका ठेवला असतानाच ठेकेदारांनी (Contractor) रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात मायक्रो सिलिका आणि आईस फ्लेक्स न वापरता मोठा हात मारल्याचे उघड झाले आहे.

BMC
Nashik ZP: 25 लाखांचा निधी काढण्याचा शिक्षण विभागाच्या डाव उधळला

नवदीप कन्स्ट्रक्शन कंपनी, एम. इ. इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व व्ही. एन. सी. इन्फ्राप्रोजेक्ट्स, एम. इ. इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि एन. सी. इंटरप्रायझेस, प्रगती इंटरप्रायझेस, कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. या सहा ठेकेदारांनी काँक्रिटीकरणाच्या कामात आईसफ्लेक्स न वापरल्याची माहिती कॅगने दिली आहे.

BMC
Mumbai: गडकरींकडून घोषणांचा पाऊस! 15000 कोटीच्या प्रकल्पांची घोषणा

मुंबईत सुमारे २ हजार किमी लांबीचे डांबरी रस्ते असून या रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने मुंबई महापालिकेने या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सुमारे १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णही झाले आहे. उर्वरित रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत.

BMC
Pune: जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात 150 कोटींची वाढ

रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी मोठ्या कंत्राटदारांना हे काम दिले जात आहे. मात्र खर्चात बचत व्हावी यासाठी सहा कंपन्यांनी काँक्रिटच्या रस्ते बांधकामात आईसफ्लेक्स न वापरल्याची माहिती कॅगने उघडकीस आणली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'कॅग'ने सादर केलेल्या अहवालात काँक्रिटीकरणाच्या कामात मायक्रो सिलिका आणि आईस फ्लेक्स न वापरताच काम करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांना ५.३ कोटींचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, चालू कंत्राटात अतिरिक्त काम करून घेण्यात आल्यामुळे या कामाचा दर्जा तपासला गेला नाही, अशी सारवासारव महापालिका प्रशासनाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com