'या' कारणामुळे रखडले बुलेट ट्रेनचे टेंडर; तब्बल 11 वेळा मुदतवाढ

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) प्रस्तावित बीकेसीतील भूखंड नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनकडे (NHSRCL) हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. बीकेसीतील ४.८४ हेक्टर भूखंडावर पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमिगत स्टेशन उभारण्यात येणार आहे. गेल्या अडीच वर्षात भूखंड हस्तांतरण न झाल्याने या टेंडरला तब्बल ११ वेळा मुदतवाढ द्यावी लागली आहे. आता या भूखंडाचा ताबा सप्टेंबरपूर्वी देण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई महापालिकेला सांगितले आहे. या भूखंडावर सध्या महापालिकेचे जम्बो कोविड रुग्णालय सुरू आहे.

Bullet Train
अन् अडीच वर्षे रखडलेला 'हा' प्रकल्प अवघ्या काही तासात ऑन ट्रॅक...

बीकेसीतील ४.८४ हेक्टर भूखंडावर पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमिगत स्थानक उभारण्यात येणार आहे. या भूमिगत बुलेट ट्रेनच्या स्थानकावर एमएमआरडीए आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारणार आहे. ही इमारत ९५ मीटर उंच असणार आहे. बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील भूमिगत स्थानकाच्या कामासाठी नोव्हेंबर २०१९मध्ये नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) टेंडर मागविले होते. मात्र राज्य सरकारने हा भूखंड एनएचएसआरसीएलला हस्तांतरीत न केल्याने या टेंडरला मुदतवाढ द्यावी लागली होती. स्थानकासाठी एनएचआसआरसीएलने काढलेल्या टेंडरला आतापर्यंत तब्बल ११ वेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र अद्यापपर्यंत बीकेसीतील भूखंड एनएचएसआरसीएलच्या ताब्यात आला नाही. त्यामुळे हा भूखंड ताब्यात आल्याशिवाय एनएचएसआरसीएलकडून टेंडर काढण्यात येणार नाहीत. त्यातून बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील स्थानकाचे काम रखडले आहे.

Bullet Train
पुण्यात सर्वच रस्त्यांची चाळण अन् महापालिका म्हणते पेठांमध्ये एकही

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता बीकेसीतील भूखंड एनएचएसआरसीएलकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासंदर्भात राज्य सरकार, एमएमआरडीए आणि एनएचएसआरसीएलमध्ये बैठका सुरू आहेत. तसेच हा भूखंड लवकर हस्तांरित करण्यासाठी एमएमआरडीएकडून पावले उचलली जात आहेत.

Bullet Train
पुणे, बंगळूरमधील आयटी सेक्टरमध्ये का वाढली नोकऱ्यांची संधी?

बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरचा भूखंड एमएमआरडीएने कोविड रुग्णालयासाठी महापालिकेला दिला आहे. या भूखंडातील काही जागेवर बुलेट ट्रेनचे स्थानक उभे राहणार आहे. हा भूखंड लवकरात लवकर खाली करण्याची मागणी एमएमआरडीने महापालिककडे केली आहे. त्यामुळे या जागेचा ताबा मिळाल्याशिवाय बुलेट ट्रेनच्या कामाला सुरवात होऊ शकणार नाही. बीकेसीतील कोविड सेंटरसह भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंपही बुलेट ट्रेन स्थानकासाठी स्थलांतरीत करावा लागणार आहे. यासाठी एमएमआरडीएने भारत पेट्रोलियमला अन्य जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र या पेट्रोल पंपाचेही अद्याप स्थलांतरण करण्यात आले नाही. त्यामुळे ही जागाही एनएचएसआरसीएलच्या ताब्यात येऊ शकलेली नाही.

Bullet Train
मुंबईत आता जलवाहतूक सुसाट; 'या' जेटींसाठी ९२ कोटी

'बीकेसीतील भूखंड सप्टेंबरपर्यंत खाली करू, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वी लवकरात लवकर भूखंड देण्यास महापालिकेला सांगण्यात आले आहे,' अशी माहिती 'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com