BMC: 'या' टेंडरवरून अनिल परब- शंभूराज देसाईंमध्ये खडाजंगी; कारण...

Anil Parab Shambhuraje Desai
Anil Parab Shambhuraje DesaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरपालिकेत (BMC) सॅनिटरी नॅपकिन खरेदीमध्ये 42 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अनिल परब (Anil Parab) यांनी विधानपरिषदेत केला. खुल्या बाजारात ४० हजार रुपये किंमतीचे यंत्र टेंडरद्वारे (Tender) ७० हजारांना खरेदी केल्याचा आरोप परब यांनी केला. पूर्व इतिहास नसलेल्या कंपनीला चुकीच्या पद्धतीने टेंडर दिल्याचेही ते म्हणाले. या आरोपानंतर अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांच्यात खडाजंगी झाली.

Anil Parab Shambhuraje Desai
Good News: 'समृद्धी'चा 85 किमीचा शिर्डी ते इगतपुरी टप्पा पूर्ण

मुंबई महापालिकेत सॅनिटरी नॅपकिन खरेदीत 42 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला. 5 हजार सॅनिटरी नॅपकिन मशीन मुंबईतील शौचालयात बसवण्यासाठी सरकारने 40 हजारांची मशीन 70 हजारांना खरेदी केल्याचा आरोप परब यांनी केला. त्यानंतर विधानपरिषदेत मंत्री शंभूराजे देसाई आणि अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

देसाई यांनी दिलेले उत्तर चुकीचे आहे, घोटाळा झाल्याचा आमच्याकडे पुरावा असल्याचे परब म्हणाले. पूर्व इतिहास नसलेल्या कंपनीला चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिल्याचे अनिल परब यांनी सांगितले. तसेच मंत्री शंभूराजे देसाई विसंगत माहिती देत असल्याचा आरोप करत हक्कभंग आणण्याचा इशारा परब यांनी दिला.

मुंबई महानगरपालिकेतील कचरा विभागामार्फत सॅनिटरी मिटिंग मशीन बसवण्यासाठी 42 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. ज्या कंपनींना हे कंत्राट मिळाले ती कंपनी केंद्रातील आहेत. रियलझेस्ट वेंडकॉन, किरवॉन वेंडसोल, पीआर एंटरप्राईजेस या कंपन्या डिसेंबर 2022 टेंडर प्रक्रियेत सहभागी होऊन त्याच महिन्यात त्यांना टेंडर मिळते. त्यांना याच वर्षी मान्यता मिळाली असून, त्यांना लगेचच 5 हजार मशिन बसवण्याची टेंडर देण्यात आले.

या मशिनची किंमत 70 हजार दाखवण्यात आली असून बाजारात त्याची किंमत 40 हजार असताना टेंडरमध्ये ती वाढवून लावण्यात आली आहे. हेच गतिमान सरकार आहे का? महिलांच्या सॅनटरी नॅपकिनमध्ये असे भ्रष्टाचार हे योग्य नाही. याबाबत संबधित जबाबदारांवर कारवाई करणार का? ही टेंडर रद्द करणार का? असा सवाल परब यांनी उपस्थित केला.

Anil Parab Shambhuraje Desai
Pune & PCMC: 70 कंपन्यांनी सरकारला असा लावला 150 कोटींचा चुना

मुंबईत 8 हजार 173 स्वच्छ्तागृह आहेत. जे सॅनिटरी मशीन बसवण्यात आले आहेत, यामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. 76 हजार किंमतीचे मशीन आपण बसवले आहेत. दोन सुविधा एकत्र देणारे एक मशिन घेण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन टेंडर काढण्यात आले होते. टेंडर कमिटीने माहिती घेतली आणि त्यानंतरच आम्ही मशीन खरेदी केली आहे. महापालिकेचे हित साधण्याचा प्रयत्न आम्ही केला, असे देसाई म्हणाले.

शंभूराजे देसाई यांनी सभागृहाला दिलेली माहिती चुकीची आहे. मी हे सिद्ध केले तर आम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणू. आम्ही मुंबईत राहतो त्यामुळे नेमके यांनी भ्रष्टाचार कसा केला हे आम्ही सांगू शकतो. शंभूराजे देसाई यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे, असे अनिल परब यांनी विधान परिषदेत सांगितले.

यावर शंभूराज देसाई म्हणाले की, मी मुंबईतील मंत्री नसलो तरी मी राज्याचा मंत्री आहे. अनिल परब यांनी जोरात बोलू नये. त्यांना ठसका लागेल. जे आरोप अनिल परब यांनी केले, मुळात एक टेंडर समिती असते ती याची माहिती घेत असते. कोणतीही अनियमितता झालेली नाही हे मी स्पष्ट करतो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com