BMC Tender : मुंबईतील 8 हजार कोटींची रस्त्याची कामे 'त्या' 4 ठेकेदारांना

BMC Tender Mumbai
BMC Tender MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (BMC) दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी चार कंत्राटदारांची (Contractors) निवड केली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील रस्ते कामांसाठी विविध करांसह ८,००० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. येत्या ऑक्टोबरपासून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी चिन्हे आहेत. (BMC Tender News)

BMC Tender Mumbai
10 हजार कोटींच्या ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात अजितदादांची दमदार एन्ट्री; ॲग्रीमेंट रोखले! हणमंतराव गायकवाड, सुमित साळुंखे फसले?

मुंबईत एकूण २०५० किलोमीटर रस्त्यांचे जाळे असून त्यातील एक हजार किलो मीटर लांबीचे रस्ते हे केवळ पश्चिम उपनगरांमध्ये आहे. तर उर्वरीत एक हजार ५० किलो मीटर लांबीचे रस्ते हे शहर आणि पूर्व उपनगर भागांमध्ये आहे. यातील १२५० किलो मीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून त्यात पश्चिम उपनगरांमधील ४९५ किलो मीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे, तर उर्वरीत सिमेंट काँक्रिट केलेले रस्ते हे पूर्व उपनगर आणि शहर भागांमधील आहेत.

पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या ४०० किलो मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी शहर भाग वगळता पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील कामे प्रगतीप्रथावर आहेत तर काही कामे पूर्ण झालेली आहेत. पूर्व उपनगरातील ७० किलोमीटर लांबीचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेतले होते, त्यातील काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही सुरू आहेत. परंतु शहर भागासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने नियोजित वेळेत काम न केल्याने त्यांचे कंत्राट रद्द करून त्यांना ६४ कोटींचा दंड आकारला आहे.

BMC Tender Mumbai
शिंदे सरकारच्या 'त्या' निर्णयामुळे छोट्या कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी; न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

त्यामुळे शहर भागातील पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांसह पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील रस्त्यांच्या कामांची टेंडर महापालिकेने प्रसिद्ध केले होते. त्यातील पात्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली. यामध्ये महापालिकेने अंदाजित लावलेल्या बोलीपेक्षा ४ ते ९ टक्के अधिक दराने लावलेल्या या कामांमध्ये कंत्राटदाराशी वाटाघाटी करून अंदाजित दरातच काम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पश्चिम उपनगरांतील तीन आणि पूर्व उपनगर आदी चार कंत्राटांना प्रशासक स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती आहे. तर शहर भागातील टप्पा एक व टप्पा दोन मधील रस्ता कंत्राट कामांबाबत पात्र कंपन्या या वाटाघाटीमध्ये बोली लावलेल्या दरातच काम करण्यास तयार असून अंदाजित दराएवढ्या किंमतीत ते काम करण्यास तयार नसल्याने याचे प्रस्ताव अडकले गेले आहेत.

प्रशासनालाही याची जास्त घाई नसून प्रत्यक्षात हे काम ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याने सध्या रस्त्यांवरील खड्डे भरणे या कामाला प्रथम प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे वाटाघाटीमध्ये कंत्राटदार किती दर कमी करतो याची प्रतीक्षा आहे.

त्यामुळे शहरातील दोन्ही टप्प्यातील कामांचे प्रस्ताव वगळता दुसऱ्या टप्प्यातील सर्व रस्ते कामांना मंजुरी दिली असून वाहतूक पोलिसांच्या परवानगीची प्रक्रिया करून त्यांच्या मंजुरीने ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात या कामांना सुरुवात होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाला आहे.

BMC Tender Mumbai
Nagpur : फडणवीस, गडकरींच्या नागपुरात चाललंय काय? 600 कुटुंबांचे घराबाहेर पडनेही का झाले मुश्किल?

उपनगरांमधील रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेली कंत्राटे

१) परिमंडळ ७ (कांदिवली ते दहिसर)

खर्च : विविध करांसह २३७४ कोटी रुपये

ठेकेदार कंपनी : बी एस सी पीएल

२) परिमंडळ ४ (विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम, गोरेगाव, मालाड)

खर्च : विविध करांसह २६५५.४५ कोटी रुपये

ठेकेदार कंपनी : आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

३) परिमंडळ ३ (वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व आणि पश्चिम, विलेपाले ते जोगेश्वरी पूर्व)

खर्च : विविध करांसह १४६४.९२कोटी रुपये

ठेकेदार कंपनी : ए आय सी इन्फ्रास्ट्रक्चर्स

४) परिमंडळ ५ व ६ (संपूर्ण पूर्व उपनगर)

खर्च : विविध करांसह १६७५.९४ कोटी रुपये

ठेकेदार कंपनी : गावर कंस्ट्रक्शन लिमिटेड 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com