BMC : मलबार हिलमधील 'त्या' राखीव भूखंडाचा लिलाव थांबवा; कोणी लिहीले महापालिकेला पत्र?

Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मलबार हिल परिसरातील उद्यानासाठी राखीव असलेली जागा व्यापारीकरणासाठी वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेद्वारे (BMC) घेण्यात आला आहे. या निर्णयास येथील स्थानिक नागरिक आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.

Mumbai
Pune Nashik Road : 'या' 6 किमीच्या मार्गावर का लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा?

मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणाची दखल घेऊन या मोकळ्या भूखंडाच्या लिलावाची प्रक्रिया थांबवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे विनंती केली.

Mumbai
वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका; पालिका अन् पोलिसांचे दुर्लक्ष

मुंबई महानगरपालिकेसारख्या नामांकित शासकीय संस्थेकडून राखीव भूखंडाचा व्यापारीकरणासाठी लिलाव करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. ज्या मूळ कारणासाठी हा भूखंड आरक्षित आहे, त्या कारणासाठी तो वापरला जायला हवा.

या भूखंडाच्या व्यापारीकरणसाठी नागरिकांनी देखील विरोध केला असून, मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या मागणीचा आदर करावा असे मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Mumbai
Pune Airport : नव्या टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे कधी सुरू होणार?

मलबार हिलमध्ये रमाबाई आंबेडकर मार्गाशेजारील बेस्टचे रिसिव्हिंग स्टेशन असलेला २४३२ स्क्वेअर मीटरचा भूखंड खाजगी व्यापारासाठी लिलावाद्वारे देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आला होता. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com