मुंबईत यंदा पावणेदोन लाख मूषकांचा खात्मा; खर्च प्रत्येकी 22 रुपये

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पावसाळ्यात साथीचे रोग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) विविध उपायोजना आखल्या जातात. लेप्टो हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. लेप्टो आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाते. मुंबई शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये 16 लाख, तर यंदाच्या वर्षी पावणेदोन लाख उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे.

BMC
पुणे महापालिका आता तरी ठेकेदारांवर नियंत्रण ठेवणार का?

महापालिका एक उंदीर मारण्यासाठी २० रुपये, तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदीर मारल्यास प्रत्येक उंदरामागे २२ रुपये दर दिला जातो. महापालिकेने यापूर्वी केवळ ५ वॉर्डमध्ये १ कोटी रुपये उंदीर मारण्यासाठी खर्च केले आहेत. त्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोपही झाले होते. मुंबई महापालिका आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून उंदीर मारण्याची मोहीम राबवली जाते.

BMC
Good News! नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त ठरला! वाचा सविस्तर...

मुंबईमध्ये 2018 पासून ते मे 2022 पर्यंत 16 लाख 45 हजार 19 उंदरांचा खात्मा मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून करण्यात आला आहे. यासाठी काही खासगी संस्थांची देखील मदत घेण्यात आली. यंदा 1 लाख 69 हजार 596 उंदरांचा खात्मा करण्यात आला. मुंबई महापालिकेसोबत काही खासगी संस्थांच्या माध्यमातून ही मोहिम संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे. खासगी संस्थेला एक उंदीर मारण्याचे 22 रुपये महापालिकेला मोजावे लागतात. मलेरिया, गॅस्ट्रो, स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू आणि लेप्टो हे रोग रोखण्यासाठी विशेष उपायोजना केल्या जात आहेत. उंदीर, कुत्रे, म्हशी, गाई यांचे मलमूत्र पाण्याच्या संपर्कात आल्यावर व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग लगेचच होतो.

BMC
नागपूर सुधार प्रन्यास करणार भरती; दोन नवीन कार्यालयेसुद्धा उभारणार

लेप्टोचा संसर्ग पसरवण्याचे काम उंदीर मोठ्या प्रमाणात करतात. उंदरांना अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. उंदीर मारण्याची ही मोहीम पावसाळ्याच्या हंगामात बंद असते. मात्र, जर दोन ते तीन दिवसांचा गॅप पडला तर मग ही मोहीम परत एकदा सुरू केली जाते. तसेच महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शक्यतो घरामध्ये उंदीर होऊ देऊ नका. घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि घरामध्ये जर उंदीर झाले असतील तर गोळ्या ठेवून त्यांचा खात्मा करा.

BMC
अमित शहांच्या अपयशानंतरही 'वाघां'नी अडवला अकोला-खंडवा रेल्वे मार्ग

5 वर्षांत उंदरांचा खात्मा
2018 - 4,75,590
2019 - 4,77,889
2020 - 1, 98, 451
2021 - 3,23,493
2022 (जानेवारी ते मे पर्यंत) - 1,69,596

BMC
पुणे महापालिकेचा दणका! दोन ठेकेदार कंपन्या गोत्यात; 3 कोटींचा दंड

भंगार आणि अडगळीच्या वस्तू घरात ठेवू नका. इमारतीचा परिसर, आवार स्वच्छ ठेवा. डेब्रिज आणि इतर सामान आवारात ठेवू नका. त्यामुळे उंदरांना आसरा मिळणार नाही. अन्नपदार्थ उघड्यावर टाकू नका. उंदरांना खायला मिळाले की, तिथेच ते बिळे करून राहतात आणि त्यांची संख्या झपाट्याने वाढते.
- राजन नारिंग्रेकर, कीटकनाशक अधिकारी, मुंबई महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com