BMC : 'ते' 263 कोटींचे वादग्रस्त टेंडर रद्द; भाजप आमदाराची माहिती

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) स्ट्रीट फर्निचरच्या २६३ कोटींच्या टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची दखल घेत ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती भाजप आमदार मिहीर कोटेचा (Mihit Kotecha) यांनी दिली.

BMC
अखेर निधी मिळाला; नाशिकच्या आमदारांना पुरवणी मागण्यांमधून 850 कोटी

जानेवारी २०२३ मध्ये आमदार कोटेचा यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना स्ट्रीट फर्निचर टेंडर प्रक्रियेत महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने गैरव्यवहार करत आहेत, असे पत्र पाठवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यासंदर्भात माहिती दिली होती. फडणवीस यांनी कोटेचा यांना याबाबत आणखी माहिती घेण्यास सांगितले होते. त्यानुसार कोटेचा यांनी या टेंडर प्रकरणातील संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे कोटेचा यांनी सांगितले आहे.

BMC
आश्चर्य! नाशिक जिल्ह्यात बनतोय अतिपावसामुळेही न खचणारा पहिला रस्ता

कोटेचा यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, या टेंडर प्रकरणाचा आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रानंतर मी गप्प झाल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. मात्र, माझ्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही टेंडर प्रक्रिया रद्द करत मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी थांबवली आहे.

BMC
PM नरेंद्र मोदींच्या 'या' योजनेला कोणी लावला 1 हजार कोटींचा चुना?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या २२०० कोटींच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार आपण पुराव्यानिशी केली होती. मात्र त्या तक्रारीची दखल  महाविकास आघाडी सरकारने घेतली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांना नाहक भुर्दंड बसला. त्याबद्दल आदित्य ठाकरेंनी बोलावे असेही आ. कोटेचा यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com