Mumbai : मुलुंड प्रकल्पग्रस्त पुनर्वसन; 'त्या' बिल्डरविरुद्ध किरीट सोमय्यांची पोलिसांत तक्रार

Kirit Somaiya
Kirit SomaiyaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुलुंड प्रकल्पग्रस्त पुनर्वसन घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, देवनार येथील ५०,००० लोकांचे स्थलांतर मुलूंड पूर्व केळकर कॉलेज जवळ करण्याच्या घोटाळ्या विरोधात नवघर पूर्व पोलिस स्टेशन येथे सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे.

Kirit Somaiya
सरकारकडे दहा हजार कोटींची बिले थकल्याने ठेकेदार आक्रमक; 27 नोव्हेंबरपासून...

२२ मार्च २०२२ रोजी राज्य सरकारमुंबई महानगरपालिकेने भ्रष्ट पद्धतीने हे कंत्राट चोरडिया बिल्डरला दिले. मुलूंड पूर्वची सध्याची लोकसंख्या १ लाख आहे, यात ५०,००० लोकांची भर होणार आहे. त्यापैकी २५,००० बांग्लादेशी असणार आहेत. महापालिकेच्या या घोटाळ्याविरूद्ध महापलिका अधिकारी, राज्य सरकारचे अधिकारी व ईस्ट पुणे रियालिटी एलएलपी या कंपनीचे चोरडिया यांच्या विरोधात आयपीसी कलम ४०६, ४०८, ४०९, १२०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

Kirit Somaiya
Mumbai : महापालिकेला ठेकेदाराची काळजी; ठेकेदाराकडे कामे नसल्याने कंत्राटासाठी शिफारस

किरीट सोमय्या म्हणाले की, मार्च २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घरे म्हणून अतुल चोरडिया, जयंत शहा आणि शाहीद बालवा यांना ३५ हजार घरांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला, ४ वर्क ऑर्डरही निघाल्या आणि यासाठी लागणारा पैसा क्रेडिट नोटने देण्याचे ठरवले. १८६७५ कोटी क्रेडिट नोट देण्याचा करार केला, १० हजार घरांचे काम सुरू झाले. ४१५ कोटींच्या क्रेडिट नोटचा पहिला हफ्ता दिला गेला. ट्रान्स्फरेबल क्रेडिट नोट हा नवीन प्रकार उद्धव ठाकरे आणि इक्बालसिंह चहल यांनी अंमलात आणला. मुलूंडसाठी २८२६ कोटी, भांडूप ७४२ कोटी, प्रभादेवी ४५० कोटी, जुहू प्रकल्प ७२०० कोटी, चांदिवली १५ ते ८४ कोटी, हे प्रकल्प चोरडिया, शहा यांना देण्यात आलेत. ४ मे २०२२ रोजी मुंबई महापालिकेच्या अर्थ विभागानेही या क्रेडिट नोटवर आक्षेप घेतला होता. महापालिकेच्या क्रेडिट नोट बाजारात विकल्या जात आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com