पुढील 50 वर्षे देशातील घरांची मागणी कायम राहणार; कारण...

Housing
HousingTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : स्वतःच्या मालतीचे घर असावे याकडे कल वाढत असल्याने आगामी पाच वर्षांत गृहकर्जांच्या मागणी वाढणार आहे. त्यामुळे देशातील गृहकर्ज बाजारपेठ दुपटीने म्हणजे सुमारे ६०० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केला.

Housing
Good News! नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त ठरला! वाचा सविस्तर...

देशातील गृहनिर्माण क्षेत्र तेजीत असून, विकसक आता आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि अधिक शिस्तबद्ध आहेत, असे सांगून ते म्हणाले, की सध्या देशातील गृहकर्ज बाजारपेठ जीडीपीच्या ११ टक्के म्हणजे सुमारे ३०० अब्ज डॉलरपेक्षा थोडी अधिक आहे. परंतु वाढते उत्पन्न, परवडण्याच्या क्षमतेतील वाढ आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा यासारख्या अनुकूलतेमुळे घरांच्या मागणीतील वाढीला चांगली चालना मिळेल, असे पारेख म्हणाले. पुढील पन्नास वर्षे देशातील घरांची मागणी कायम राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

Housing
16 कोटीत उभारणार मुंबईतील 'हा' स्कायवॉक; ऑक्टोबरपासून...

‘गृहनिर्माण कर्जाची बाजारपेठ दुप्पट वाढण्याची शक्यता असली तरी तारण क्षेत्रातील व्यवसाय मात्र जीडीपीच्या १३ टक्क्यांपेक्षा कमी राहील. तुलनात्मक आशियाई अर्थव्यवस्था पाहिल्यास, सरासरी गुणोत्तर २० ते ३० टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे आपल्या देशात हा व्यवसाय वाढीसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असे पारेख म्हणाले.

Housing
गुड न्यूज: कोल्हापूर एअरपोर्टसाठी ५२ कोटी; या सोईसुविधा...

'भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णयासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळे गृहकर्ज व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही बँकिंगमध्ये त्याचा समावेश केला आहे. यामुळे कर्ज देण्यासाठी मोठे भांडवल स्त्रोत उपलब्ध असतील आणि खर्चही कमी असेल. एचडीएफसी अर्थात हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झाल्यामुळे त्याचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. जागतिक स्तरावरही, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या तुलनेत बँकांमधील तारण मालमत्तेचे प्रमाण अधिक आहे. नियामक दृष्टीकोनातून, गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या सर्व मोठ्या कंपन्यांसाठी समान नियम असणे आवश्यक आहे,’ असे या वेळी पारेख यांनी एचडीएफसीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com