मुंबई-पुणे प्रवासात 1 तास वाचणार! MTHL Extension बाबत मोठी बातमी

MTHL Extension
MTHL ExtensionTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : वेगवान वाहतुकीसाठी मुंबई - नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड (Mumbai Trans Harbour Link Road) आता मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेला (Mumbai - Pune Expressway) जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मुंबई - पुणे प्रवासात वेळ व इंधनाची बचत होईल. या एमटीएचएल एक्स्टेंशन प्रकल्पासाठी (MTHL Extension) 2 हजार 639 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.

MTHL Extension
'इन्फ्रा' ठरणार अर्थव्यवस्थेच्या वाढीचा पासवर्ड! जाणून घ्या कारण

हा लिंक रोड 22 किलोमीटरचा असून 16.5 किलोमीटरचा मार्ग समुद्रातून आणि 5. 5 किलोमीटर अंतराचा मार्ग जमिनीवरुन जातो. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 17 हजार 843 कोटी रुपये आहे. सरकारने एमटीएचएल प्रकल्पासाठी 'जायका' या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून घ्यावयाच्या कर्जासाठी 15 हजार 100 कोटी रुपयांच्या मर्यादेत शासन हमी दिलेली आहे.

MTHL Extension
फडणवीस सरकारने नागपुरची तहान भागविण्यासाठी आणलेला प्रकल्प गुंडाळला

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील वाहतुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने प्राधिकरणाद्वारे रायगड जिह्यातल्या उरण तालुक्यातील चिर्ले गाव ते मुंबई-पुणे एक्सप्रेस वे असा एमटीएनएल एक्स्टेंशन प्रकल्प 2023 पर्यंत तयार होणार आहे.

MTHL Extension
Pune : चांदणी चौकात वाहनांच्या संख्येपुढे पोलिसही हतबल

हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास निधीची आवश्यकता आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी मेगा सिटी स्कीम फंडातून एकूण 2 हजार 649 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

MTHL Extension
ठाणे, पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी गुड न्यूज;रुग्णालयास 527 कोटी

मुंबई मेगासिटी स्कीम रिव्हॉल्व्हिंग फंडातून घ्यायच्या कर्जाचा विनियोग केवळ एमटीएचएल एक्स्टेंशन प्रकल्प म्हणजे चिर्ले ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी करणे अनिवार्य आहे.
या प्रकल्पाच्या कर्जाच्या परतफेडीसाठी शासन हमी देणार नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्पन्नस्रोतांचा आढावा घेऊन उत्पन्नवाढीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच यापूर्वी उभारलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड विहित कालावधीमध्ये करावी, अशी सूचना शासनाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com