Big News: MSRTC चे 5150 ई-बसेसचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात

ST Bus Stand - MSRTC
ST Bus Stand - MSRTCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ५,१५० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचे टेंडर (Tender) 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक' (ईव्हे ट्रान्स) कंपनीला मिळाले आहे. टेंडरनुसार २८०० ई-बसेस या 12 मीटरच्या तर २,३५० ई-बसेस 9 मीटर लांबीच्या आहेत. या बसेस एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ३०० कि.मी. अंतर धावू शकतात.

ST Bus Stand - MSRTC
Nagpur: 'या' देखण्या प्रकल्पाचे राष्ट्रपतींकडून लोकार्पण

राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार एसटीने गेल्यावर्षी 1 जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण केले आहे. पहिल्या टप्प्यात 150 'शिवाई' बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. टेंडर प्रक्रियेद्वारे ई-मूव्हज कंपनीशी 50 व ऑलेक्ट्रा ग्रीनटेक (इव्हे ट्रान्स) कंपनीशी 100 बसगाड्यांचा भाडेकरार झाला आहे. यापैकी काही ई-बस ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. उर्वरित बसगाड्या लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने अलीकडेच ५,१५०  इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. या बसगाड्या घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून कर्ज घेण्यासही राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार महामंडळाने ५,१५० ई-बसेससाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती. नुकतेच हे टेंडर "ऑलेक्ट्रा ग्रीनटेक" (ईव्हे ट्रान्स) कंपनीला मिळाले आहे.

टेंडरनुसार येत्या काही काळात तब्बल ५,१५० ई-बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. १२ मीटर लांबीच्या २,८०० बसेस आणि ९ मीटरच्या २,३५० बसेस अशा दोन प्रकारात या बसगाड्या आहेत. त्यापैकी १५० गाड्या चालू वर्षात तर उर्वरित ५००० गाड्या पुढील वर्षात पुरवठा करायच्या आहेत. प्रोटो तपासणी तारखेपासून साधारण 24 महिन्यात संपूर्ण बसेसचा पुरवठा करणे कंपनीवर बंधनकारक आहे.

ST Bus Stand - MSRTC
Nashik: पेठ रोडवरील अडीच कोटींचे डांबर वाहून गेलेच कसे?

बारा मीटरच्या बसेसची आसनक्षमता ४४ प्रवाशांची आणि ९ मीटर बसेसची आसनक्षमता ३२ प्रवासी इतकी आहे. या सर्व ई-बसेस वातानुकूलित स्वरुपातील आहेत. या जास्तीत जास्त ई-बसेस शहर ते शहर चालतील म्हणजे गावातल्या गावात चालवण्याऐवजी गावे जोडण्याला प्राधान्य देण्याचे एसटीचे धोरण आहे.

या ई-बसेस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकूलित व आवाज विरहित आहेत. बसची रंगसंगती सुद्धा आकर्षक आहे. या बसेस एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ३०० कि.मी. अंतर धावू शकतात. ही बस पूर्ण चार्ज करण्यासाठी सुमारे ४ तासांचा वेळ लागतो. या ई-बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फ्रंट आणि रिअर एअर सस्पेंशन, लक्झरी सीट्स, एसी बसेस, डिस्क ब्रेक्स आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत.

सध्या, ईव्हे आणि ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड देशातील विविध राज्य परिवहन उपक्रमाअंतर्गत (STU) इलेक्ट्रिक बस चालवत आहेत. पुणे (PMPML), मुंबई (BEST), तेलंगणा, गोवा, डेहराडून, सुरत, अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर इत्यादी ठिकाणी या ई-बसेस कार्यरत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com