'सारथी'बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळाने मंजूर केली...

SARTHI, Pune
SARTHI, PuneTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी - SARTHI), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37 मधील 3 हजार 500 चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

SARTHI, Pune
बीकेसीतील दोन भूखंडाच्या ई-ऑक्शन टेंडरिंगला तारीख पे तारीख...

राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सारथी संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, जेष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इत्यादी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी 500 मुलांचे व 500 मुलींचे स्वतंत्र निवासी वसतिगृह देखील उभारण्यात येणार आहे.

SARTHI, Pune
मोठ्या रकमेचे व्यवहार करताय! मग हे वाचाच; 20 लाखांहून अधिकच्या...

याअंतर्गत नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37 मधील 3500 चौ.मी. क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com