राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' पदांच्या भरतीला हिरवा कंदील

MPSC
MPSCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : स्पर्धा परीक्षेची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने (State Government) गुड न्यूज (Good News) दिली असून, विविध विभागांमधील रिक्त पदे (Vacant Positions) भरण्यासाठी परवानगी दिली आहे. सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission - MPSC) कक्षेतील १०० टक्के पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याच बरोबर ज्या प्रशासकीय विभागांनी अर्थ विभागाच्या निर्णयानुसार सुधारित आकृतीबंध मंजूर केला आहे, त्यापैकी एमपीएसच्या कक्षेतील पदे वगळता ५० टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

MPSC
देशातील सर्वांत मोठ्या सागरी सेतूचे स्वप्न लवकरच येणार प्रत्यक्षात

या निर्णयामुळे ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर केला आहे, अशा सुधारित आकृतीबंधातील एमपीएससीच्या कक्षेतील १०० टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकणार आहे.

MPSC
...तर मुंबईची पुन्हा 'तुंबई' होण्याचा धोका; कोणी केला आरोप?

राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून मंगळवारी (ता. १२) शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MPSC
गुड न्यूज; 'या' महापालिकेत लवकरच ८८० जागांसाठी 'मेगा भरती'

ज्या प्रशासकीय विभागांनी अर्थ विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसल्यास किमान एक पद भरता येणार आहे.

MPSC
मुंबई एअरपोर्टच्या धर्तीवर 950 कोटींतून साकारणार 19 रेल्वे स्टेशन


ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील एमपीएससीतील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मुभा देण्यात याली आहे.

MPSC
पाच शेळ्या पळवल्या कोणी? नागपूर झेडपीत आणखी एक घोटाळा

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत ४ मे २०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्चस्तरीय सचिव समितीने/उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com