काय आहे 'बेस्ट'चे 'मिशन 10 हजार'? 900 डबलडेकर...

BEST
BESTTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाने १० हजार इलेक्ट्रिक बस मिशन हाती घेतले आहे. आयकॉनिक अशा डबलडेकर बसचा मोठा इलेक्ट्रिक ताफा येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्यासाठीच बेस्ट उपक्रमाने ९०० इलेक्ट्रिक डबलडेकर बस मुंबईच्या रस्त्यांवर चालवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

BEST
महाविकास आघाडीचे कोळशाने हात काळे? ६ हजारांचा कोळसा १६ हजारांना...

बेस्ट उपक्रमाच्या सध्याच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या एकूण ४५ डबलडेकर बस आहेत. त्यांपैकी बहुतांश येत्या काही दिवसांमध्ये मोडीत निघणार आहेत. त्यामुळेच अधिक प्रवासी वाहतुकीची क्षमता असलेल्या बस घेण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण आणि इंधन खर्च कमी करणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा पर्याय बेस्ट उपक्रमाने ठेवला आहे. बेस्ट उपक्रमात आगामी काळात १० हजार इलेक्ट्रिक बसचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

BEST
नोकरी सोडतानाही आयटी कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप, कारण...

बेस्टच्या ताफ्यात ९०० पैकी ऑगस्टअखेर एकूण २५ टक्के बस दाखल होतील. त्यानंतर उर्वरित ७५ टक्के बस वर्षअखेरीस उपलब्ध होतील, असे उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या बसमध्ये प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठीचा वेगवेगळा पर्याय असेल. सध्याच्या बसमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. देशात डबलडेकर चालवणारा ‘बेस्ट’ एकमेव उपक्रम आहे. डबलडेकरचा पर्याय इलेक्ट्रिक बसच्या रूपात आणणाराही बेस्ट पहिलाच उपक्रम आहे. त्याशिवाय देशात सर्वाधिक ३८६ इलेक्ट्रिक बस मुंबईच्या बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत.

BEST
ग्लोकल मॉलसाठी ५० वर्षांपासूनची दुकाने एका झटक्यात भूईसपाट

बेस्ट बसचा सध्याचा ताफा
मिडी बस ः ४६६
सिंगल डेकर एसी आणि नॉन एसी ः १,३६२
डबलडेकर ः ४५
बेस्टच्या मालकीच्या बस ः १,८७३
भाडे करारावरील बस ः १,७२९
एकूण बस ः ३,६०२

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com