Mumbai : 700 एसी डबलडेकर ई-बसेससाठी रिटेंडर; ठेकेदाराची माघार

BEST
BESTTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईमधील जुन्या डबल डेकर बसेसचे आयुर्मान संपल्याने नवीन इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस खरेदीचा निर्णय बेस्टने घेतला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ९०० इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात येणार होत्या. मात्र ठेकेदाराने माघार घेतल्याने त्यापैकी ७०० बसेस वेळेवर मिळणार नसल्याचे सांगितले जाते. या ७०० बसेससाठी बेस्ट प्रशासनाने नव्याने टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासोबतच पर्यावरणपूरक ५० ओपन डेक बसेससाठी सुद्धा टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

BEST
EXCLUSIVE : DGIPRमध्ये 500 कोटींचा जाहिरात घोटाळा!

बेस्टकडून एक मजली आणि दुमजली बसेसच्या माध्यमातून मुंबईतील प्रवाशांना परिवहन सेवा पुरवली जाते. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी बेस्टने अलीकडे एसी आणि इलेक्ट्रिक बस कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात असलेल्या एकूण बसपैकी सुमारे अर्ध्या बस भाडेतत्त्वावरील आहेत.

BEST
Devendra Fadnavis:म्हाडाच्या धोकादायक इमारतीसाठी पुनर्विकास योजना

दरम्यान, मुंबईमधील जुन्या डबल डेकर बसेसचे आयुर्मान संपल्याने नवीन इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस खरेदीचा निर्णय बेस्टने घेतला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ९०० इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात येणार होत्या. बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या ९०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसपैकी स्विच कंपनी २०० बस देणार आहे. त्यापैकी एक बस बेस्टच्या ताफ्यात नुकतीच आली आहे. इतर १९९ बसेस लवकरच ताफ्यात येणार आहेत. मात्र बेस्टने आणखी एका कंत्राटदाराला ७०० बसची ऑर्डर दिली होती. या कंत्राटदाराने माघार घेतल्याने या बसेस घेण्यासाठी नव्याने टेंडर मागवण्यात आल्याची माहिती बेस्टमधील उच्चपदस्थांनी दिली. नव्याने टेंडर मागवण्यात आल्याने या बसेस बेस्टच्या ताफ्यात येण्यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे चालू वर्षात या बसेस ताफ्यात येण्याची शक्यता नाही.

BEST
Mumbai : 'त्या' दोन उद्यानांसाठी बीएमसी करणार साडेपाच कोटी खर्च

बेस्टच्या ५ ओपन डेक बस आहेत. या बस सध्या पर्यटकांसाठी वापरल्या जात आहेत. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी या बसमधून पर्यटक मुंबई दर्शन तसेच हेरिटेज टूरचा आनंद घेतात. पर्यटकांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमाने ५० ओपन डेक बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ओपन डेक बसचा पहिला मजला खुला असणार आहे. तर खालील मजला हा एसी असणार आहे. या बसेस पर्यावरणपूरक असून या बसेससाठी टेंडर मागवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com