बेस्टच्या २,१०० ई-बसचे टेंडर रखडले; ८ महिने विलंबाची शक्यता

Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : बेस्टने उपक्रमाने इलेक्ट्रा कंपनीला २१०० बसेसचे कंत्राट दिले होते. त्यापैकी २५ टक्के म्हणजे जवळपास ५०० बसेस या येत्या सहा महिन्यात उपलब्ध होणार होत्या. पण ही टेंडर प्रक्रिया आता न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने या बसेस मुंबईत बेस्टच्या प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सुमारे आठ महिने विलंब होण्याची शक्यता आहे.

Mumbai
आठवडाभरच पाऊस, काय ते रस्ते अन् खड्डे ठेकेदाराचं काम एकदम 'ओक्केच'

बेस्टच्या बसेसमध्ये तुडुंब होणारी गर्दी पाहता येत्या दिवसांमध्येही मुंबईकरांची गैरसोय कायम राहणार आहे. येत्या आठ महिन्यातही बेस्टच्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध होणार नाहीत अशीच सध्या चिन्हे आहेत. बेस्टच्या ताफ्यात येऊ घातलेल्या इलेक्ट्रिक बसेसचे टेंडर रखडल्यानेच आता पुढील आठ महिने मुंबईकरांना प्रवासी वाहतुकीत गैरसोय सहन करण्याशिवाय पर्याय नाही. वर्ष अखेरीपर्यंत मुंबईत ५०० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणे अपेक्षित होते. पण हायकोर्टात टेंडर प्रक्रिया रखडल्याने मुंबईकरांच्या गैरसोईत भर पडणार आहे.

Mumbai
पुणे जिल्ह्यातील प्रॉपर्टी कार्डमुळे भूमी अभिलेखला 'एवढा' महसूल

बेस्ट समितीने इलेक्ट्रा कंपनीला बसचे कंत्राट देण्यासाठी विरोध केला होता. पण प्रशासनाने मात्र परस्पर टेंडर प्रक्रिया काढत हे कंत्राट इलेक्ट्रा कंपनीला दिले. या निर्णयाविरोधात टाटा मोटर्सने हायकोर्टात धाव घेतली. पण या प्रकरणात हायकोर्टाचा निकाल आल्याने ही संपूर्ण टेंडर प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध होण्यासाठी आणखी आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे या ५०० बसेसची भर पडण्यासाठी पुढील वर्ष उजाडण्याची चिन्हे आहेत. मुंबईत बसची देवा देणाऱ्या वाहतूक बेस्ट वाहतूक उपक्रमाकडे एकूण ३६२७ बसेस आहेत. त्यामध्ये १८५४ बसेस या बेस्टच्या मालकीच्या आहेत. तर १७९३ बसेस या भाडे तत्वावर ताफ्यात आहेत.

Mumbai
मुंबई-हावडा थर्ड रेल्वे लाईनचा विस्तार; 'या' नदीवर उभारणार 5 पूल

बेस्टच्या २१०० बसेसच्या कंत्राटानुसार पहिल्या टप्प्यातील २५ टक्के बसेस या ५०० इतक्या प्रमाणात वर्ष संपण्याच्या आधीच मुंबईकरांच्या सेवेत आल्या असत्या. परंतु ही प्रक्रिया रखडल्याने बसेस ताफ्यात येण्यासाठी पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्याच्या बसेसच्या उपलब्धततेनुसार अवघ्या ५० अशोक लेलॅण्ड कंपनीच्या बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. तर सध्याच्या बेस्टच्या ताफ्यातील १८५४ बसेसपैकी ३०० बसेस स्क्रॅपसाठी जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाडेतत्वावरील बसेसमध्ये ३४० बसेस या टाटा मोटर्सने पुरवलेल्या आहेत. तर ४० बसेसचा पुरवठा हा इतर कंपन्यांकडून करण्यात आला आहे. डबल डेकर बसेसचाही समावेश येत्या दिवसांमध्ये बेस्टच्या ताफ्यात होणार आहे. एकूण ९०० डबल डेकर बसेस मुंबईत प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. त्यासाठीची प्रोटोटाईप बस ही सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे. तर प्रत्यक्ष बस पुरवठा सुरु होण्यासाठी पुढील वर्ष उजाडेल असा अंदाज आहे.

बेस्टच्या ताफ्यातील बसेस
बेस्टच्या मालकीच्या बसेस १८५४
भाडेतत्वावरील बसेस १७९३
एकूण बसेस ३६२७

बेस्ट समितीने विरोध केलेला असतानाही इलेक्ट्रा कंपनीला बेस्ट प्रशासनाने टेंडर प्रक्रियेत बस पुरवठ्याचे कंत्राट दिले. खुद्द सत्ताधारी पक्षाचाही विरोध असताना बेस्ट प्रशासनाने हा मनमानी कारभार केला. पण याचा फटका हा सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे.
- सुनिल गणाचार्य, माजी बेस्ट समिती सदस्य

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com