इलेक्ट्रिक बस खरेदी: बेस्टला २६४ कोटींचा 'बूस्टर' डोस

bus
busTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) २६४ कोटी रुपये दिले असून महापालिकेने हा निधी आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला वर्ग केला आहे. इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी बेस्टला हा निधी देण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून विजेवर धावणारी वाहने घेण्यासाठी ९४० कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. तेही बेस्टलाच देण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

bus
EXCLUSIVE : मंत्री सुभाष देसाईंचा मर्जीतील लोकांसाठी 'उद्योग'

विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा, वायुप्रदूषण कमी व्हावे आणि स्वच्छ हवा कार्यक्रम राबविण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार विविध राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून निधी उपलब्ध करण्यात येतो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर वाढवून प्रदूषण नियंत्रणात आणता यावे यासाठी केंद्र सरकारने मुंबई महापालिकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी २६४ कोटी रुपये अनुदान दिले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा निधी पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. पुढील पाच वर्षांमध्ये केंद्राकडून पालिकेला टप्प्याटप्प्याने ९४० कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.

bus
मुंबई-नागपूर सुसाट; समृद्धीमुळे अंतर अवघे एवढ्या तासांवर

मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये बस सेवा उपलब्ध करणारा बेस्ट उपक्रम पालिकेचे एक अंग आहे. प्रदूषण रोखण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये विजेवर धावणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा आर्थिक तोट वाढत असून उपक्रमाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन विजेवरील बसगाड्या घेण्यासाठी पालिकेने बेस्टला हा निधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पालिकेने अलीकडेच २६४ कोटी रुपये बेस्टच्या तिजोरीत जमा केले. विजेवरील बसगाड्या घेण्याबरोबरच चार्जिंग केंद्र आणि अन्य आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी हा निधी बेस्टला उपयोगी पडेल, असे पालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी सांगितले.

bus
मुंबई-गोवा सुसाट...; आता थेट सिंधुदुर्गापर्यंत पर्यायी मार्ग

आजघडीला बेस्टच्या ताफ्यात तीन हजार ५०० बसगाडय़ा असून त्यापैकी ३८४ बसगाड्या विजेवर धावणाऱ्या आहेत. बेस्ट उपक्रमासमोर आपल्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या बसगाड्यांची संख्या २०२३ पर्यंत ५० टक्के, तर २०२७ पर्यंत १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्राकडून मिळालेला निधी पालिकेने बेस्ट उपक्रमाला विजेवरील बसगाड्या घेण्यासाठी उपलब्ध केला आहे. मात्र या निधीचा कशा पद्धतीने विनियोग केला याचा ताळेबंद बेस्टला पालिकेला सादर करावा लागणार आहे. तशा सूचना बेस्ट उपक्रमाला करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com