मुंबई (Mumbai) : अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा 'अटल सेतू' शनिवारी (दि. 13) सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या सागरी सेतूवर कारसाठी एकवेळ २५० रुपयांचा तर अवजड वाहनांसाठी एकवेळ १,५८० आणि मासिक तब्बल ७९ हजार रुपये इतका टोल आकारला जाणार आहे.
या सागरी सेतुमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. हा सागरी सेतू उभारण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला हा देशातील पहिला मार्ग ठरणार आहे. या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात. प्रत्येक वाहनाकडून वेगवेगळा टोल आकारला जाणार आहे. त्यानुसार सिंगल, रिटर्न, डेली आणि मासिक पास उपलब्ध करुन दिला जणार आहे. कारसाठी सिंगल टोल २५० रुपये आणि मासिक पास १२,५०० रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल १,५८० रुपये तर, मासिक पास तब्बल ७९ हजार रुपये इतका लागणार आहे.
विशेष म्हणजे मुंबई-पुणे दरम्यान एसटीच्या शिवनेरीचा प्रवास आता फेसाळणाऱ्या लाटा पाहत पूर्ण करणं शक्य होणार आहे. शिवनेरीच्या प्रवासात पनवेलसह इतर लहान-मोठे थांबे नसतील त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास जलद आणि सुकर होईल. अटल सागरी सेतूवर मोटर सायकल, मोपेड, तीन चाकी टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रॉलीला परवानगी नाही.
३१ डिसेंबर २०२४ पर्यंतचा टोल दर -
वाहने / सिंगल जर्नी / रिटर्न जर्नी / डेली पास / मंथली पास
कार / २५० / ३७५ / ६२५ / १२५००
एलसीव्ही / मिनी बस / ४०० / ६०० / १००० / २००००
बस/२-अॅक्सेल ट्रक / ८३० / १२४५ / २०७५ / ४१५००
एमएव्ही (थ्री अॅक्सेल) / ९०५ / १३६० / २२६५ / ४५२५०
एमएव्ही ( ४ टू ६ अॅक्सेल) १३०० / १९५० / ३२५० / ६५०००
ओव्हरसीझ / १५८० / २३७० / ३९५० / ७९०००