सरकारी नोकरी हवीयं! तब्बल ७ हजार जागांची मेगाभरती; 'या' आहेत जागा

Jobs
JobsTendernama
Published on

पुणे (Pune) : सरकारी नोकरी मिळविण्याची स्वप्ने पाहणारे आणि खऱ्या अर्थाने या परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. स्वप्नपूर्ती करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पदवीधरांसाठी सरकारी, विविध संस्था तसेच बँकेमध्ये तब्बल सात हजारांहून अधिक जागांसाठी नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

Jobs
IMPACT : 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर हाफकिनला राज्य सरकारची नोटीस

एकूण जागा व मुदत

- भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३८,९२६ जागा असून त्यापैकी मराठी, कोकणी भाषा येत असलेल्यांसाठी राज्यातील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३,०२४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदासाठी ६ जून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

- दिल्ली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये वरिष्ठ निवासी (वरिष्ठ निदर्शक) पदासह विविध पदांच्या ४१३ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी १६ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

- भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील फार्मासिस्ट, फायरमन आणि पेस्ट कंट्रोल वर्कर पदाच्या १२७ जागांसाठी भरती होणार असून अर्ज २६ जूनपर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

- भारतीय सैन्य दलात नाई, चौकीदार, सफाईवाला, आरोग्य निरीक्षक, स्वयंपाकी, व्यापारी मेट, वॉर्ड सहाय्यक आणि वॉशरमन पदाच्या एकूण १५८ जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

- हिंदुस्तान उर्वरक व रसायनच्या आस्थापनेवर मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अधिकारी, अभियंता आणि कंपनी सचिव पदाच्या १७९ जागा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४११ जागांसाठी भरती.

- हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण १७९ जागा भरती. भारतीय स्टेट बँकेमध्ये प्रणाली अधिकारी, कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी पदाच्या एकूण ३६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

- तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३६१४ जागा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या विभागांसह इतरही विभागांमध्ये रिक्त पदांची भरती होत आहे. संबंधित जाहिराती ऑनलाइन उपलब्ध आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com