Mumbai : मीरा भाईंदरमध्ये 1800 कोटींच्या काँक्रिट रस्त्यांच्या कामांना 'हा' मुहूर्त

Road
RoadTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मीरा भाईंदर शहरातील सुमारे १८०० कोटी खर्चून काँक्रिट रस्ते बांधण्याची कामे पावसाळ्यानंतर सुरु केली जातील. सूर्या योजनेनुसार २४ तास पाणी साठी शहर अंतर्गत पाणी वितरण योजनेचे काम सुद्धा सुरु केले जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिली आहे.

Road
Thane : महापालिकेने अखेर 'त्या' ठेकेदाराला टाकले काळ्या यादीत

राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने शहरातील विविध विकासकामांना मंजुरी आणि निधी शासनाने दिला आहे. शासनाने निधी दिलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांकडे नुकतीच बैठक झाली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, शहर अभियंता दीपक खांबित, मुख्यलेखा परीक्षक सुधीर नाकाडी आदी उपस्थित होते. यावेळी आ.सरनाईक यांनी विविध विकास कामांवर आयुक्तांशी चर्चा केली. मराठा भवन इमारत बांधकाम वेगाने करणे, नवीन महापालिका मुख्यालय इमारतीच्या कामाची सुरुवात करणे, मीरारोड येथील रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरु करणे आदी कामांचा समावेश होता.

Road
Thane : कंत्राटी बस वाहकांचा अर्धा पगार खाणारे बोके कोण?

महापालिका मुख्यालयासाठी आवश्यक परवानग्या व प्रक्रिया पूर्ण करून काम सुरु करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. बीएसयुपी प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरु आहे. एमएमआरडीएकडून ४० कोटीचे कर्ज मंजूर झाले असून उर्वरित ११० कोटी मिळण्यासाठी प्रयत्न करू. प्रतीक्षेतील लाभार्थ्यांना घरे मिळण्यासाठी पीपीपी तत्वावर ठाणे महापालिकेच्या धर्तीवर बीएसयुपी योजना राबवा. महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा पुढील वर्षांपासून सुरु करावी. स्विमिंग पूल, फुटबॉल टर्फ, लता मंगेशकर संगीत गुरुकुल कामांसाठी शासना कडून विशेष निधी मिळाला असल्याने ही कामे लवकर सुरु करा असे आ.सरनाईक म्हणाले.

Road
Mumbai : तब्बल 90 कोटींचे वादग्रस्त टेंडर भोवले; 'या' अधिकाऱ्याची तडकाफडकी...

आगामी १ वर्षात लोकसभा, विधानसभा, महापालिका यांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेत विकासकामे पूर्ण करावीत. नवीन विकास आराखडा बनवत असताना त्यात बस पार्किंग, दफनभूमी, मार्केट, घनकचरा प्रकल्प, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, सर्वधर्मीय स्मशान भूमी अशी विविध आरक्षणे ठेवण्यात यावीत आदी गोष्टींची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com