Ajit Pawar : का वाढतात विकास प्रकल्पांच्या किंमती? काय म्हणाले अजित पवार?

Pune
PuneTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. तसेच पुणे शहरात वाहतूक कोंडीची (Pune City Traffic) समस्या गंभीर असून सर्व विभागांनी योग्य समन्वय राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

Pune
Sambhajinagar : कोट्यवधींचा नवा डांबरी रस्ता फोडून सिमेंट रस्त्याचा घाट; एमआयडीसीचा प्रताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प नियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

पवार म्हणाले की, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक तीनच्या कामाला गती द्या तसेच हडपसर ते लोणीकाळभोर, हडपसर ते सासवड, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या वाढीव मेट्रो मार्गांच्या परवानगीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करा. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. त्याचबरोबर पुणे शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत.

पुणे शहरात दर वर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागांनी योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी.

Pune
Sambhajinagar : सातारा-देवळाई, बीड बायपासकरांना मूलभूत सुविधांपासून 'बायपास' करणारे मनपा प्रशासक याचे उत्तर देणार का?

उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सैनिक स्कूल, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषिभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com